Inspirational Stories in Marathi : Ratan tata landed a plane in the age of 17 | सॅल्यूट! हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन; अन् रतन टाटांनी असं केलं होतं सुरक्षित लँडिंग, वाचा पूर्ण किस्सा

सॅल्यूट! हवेत बंद झालं होतं विमानाचं इंजिन; अन् रतन टाटांनी असं केलं होतं सुरक्षित लँडिंग, वाचा पूर्ण किस्सा

(Image Credit- Bccl)

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा त्यांच्याविषयी तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. सोशल मीडियावर रतन टाटा (Ratan Tata) सक्रिय असतात तसंच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेतसुद्धा असतात. सध्या रतन टाटांचा एक फोटो व्हायरल झाल होता. ज्यात तुम्ही पाहिलं असेल की रतन टाटा कंपनीतील एका कर्मचाऱ्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. आज आम्ही तुम्हाला रतन टाटा  १७ वर्षांचे असताना घडलेला एक धाडसी किस्सा सांगणार आहोत. 

तुमचा विश्वास बसणार नाही पण खूप कमी वयात रतन टाटांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केला होता.  वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग केले होते. यावेळी एक चिंताजनक घटना घडली होती. विमानाचं इंजिन उड्डाण घेतल्यानंतर खराब झालं होतं. त्यावेळी  हे इंजिन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हतं. अशावेळी प्रसंगावधान दाखवत रतत टाटांनी असं काही केलं जे इतर कोणालाही करणं शक्य झालं नसतं. त्यांनी कठीण परिस्थितीसुद्धा विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं.

दरम्यान १९३२ साली जेआरडी टाटा यांनी पहिल्या एअरलाईन्सची स्थापना केली. त्याला टाटा एअरलाईन्स (Tata Airlines ) असं नाव देण्यात आलं. ज्याचे नाव नंतर एअर इंडिया (Air India)  ठेवण्यात आले. . सगळ्यात आधी कराची ते मुंबईपर्यंत विमान उडवलं होते. बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

रतन टाटा फक्त सामान्य विमान उडवत नाही तर  फायजर जेट F-16 सुद्धा उडवतात. त्यांना विमानं खूप आवडतात. रतन टाटा हे देशातील पहिले असे उद्योगपती आहेत. ज्यांना  फायटर विमान उडवण्याची संधी मिळाली होती. लहानपणी आईचे कपडे घालून बघायचा WWE रेसलर; आता बनला ट्रांसजेंडर, उलगडला संपूर्ण प्रवास

Web Title: Inspirational Stories in Marathi : Ratan tata landed a plane in the age of 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.