प्रेयसीसाठी सैनिकाने पत्नीची दिली सुपारी, सासूकडूनच उधार घेतले 10 लाख रूपये, पण मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:52 IST2022-07-30T14:51:56+5:302022-07-30T14:52:48+5:30

Crime News : व्यक्तीने शूटर्सना आश्वासन दिलं होतं की, जर हल्ल्यात त्याची पत्नी वाचली तरी तो त्यांना अर्धी रक्कम देणार. म्हणजे त्याला कोणत्याही स्थितीत पत्नीला संपवायचं होतं.

Indonesia soldier husband hired shooters to kill wife for girlfriend spends mother in laws money | प्रेयसीसाठी सैनिकाने पत्नीची दिली सुपारी, सासूकडूनच उधार घेतले 10 लाख रूपये, पण मग...

प्रेयसीसाठी सैनिकाने पत्नीची दिली सुपारी, सासूकडूनच उधार घेतले 10 लाख रूपये, पण मग...

Crime News : एका व्यक्तीने आपल्या पत्नीला संपवण्यासाठी खतरनाक प्लान केला. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत शिफ्ट व्हायचं होतं. अशात त्याने पत्नीला मारण्यासाठी 10 लाख रूपयांमध्ये चार शूटर्स हायर केले. शूटर्सने त्याच्या पत्नीवर गोळीही झाडली, पण ती वाचली. चला जाणून घेऊ त्यानंतर काय झालं.

ही घटना आहे इंडोनेशियातील (Indonesia). इथे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीसाठी आपल्या पत्नीला संपवण्याचा प्लान केला. ही व्यक्ती एक सैनिक आहे. त्याने 10 लाख रूपयांमध्ये 4 शूटर्स हायर केले आणि आपल्या पत्नीची सुपारी दिली. सुपारी देण्यासाठी त्याने त्याच्या सासूकडूनच पैसे घेतले होते. तिला त्याने वेगळं कारण सांगून पैसे मागितले होते.

'द मिरर'च्या वृत्तानुसार, व्यक्तीने शूटर्सना आश्वासन दिलं होतं की, जर हल्ल्यात त्याची पत्नी वाचली तरी तो त्यांना अर्धी रक्कम देणार. म्हणजे त्याला कोणत्याही स्थितीत पत्नीला संपवायचं होतं.

ठरल्याप्रमाणे शूटर्सने सैनिकाच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी महिला तिच्या मुलीसोबत होती. शूटर्सने तिच्यावर एकापाठी एका चार गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यावर महिला जखमी झाली आणि त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुदैवाने तिचा जीव वाचला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि पोलिसांनी त्याच आधारे तपास सुरू केला. नंतर चारही शूटर्स पकडण्यात आले. त्यांच्या जबाबाच्या आधारावर महिलेच्या पतीचा शोध सुरू झाला. पण तो काही सापडला नाही.

काही आठवड्यांनंतर पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला. असं सांगितलं जात आहे की, पकडला जाण्याच्या भीतीने त्याने विष खाऊन आपला जीव दिला. तेच शूटर्सपैकी एका व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, ती व्यक्ती त्यांच्यावर चिडली होती. कारण आम्ही त्याच्या पत्नीला मारण्यात अपयशी ठरलो होतो.

Web Title: Indonesia soldier husband hired shooters to kill wife for girlfriend spends mother in laws money