बोंबला! १७ वर्षाच्या मुलीसोबत केलं होतं ७० वर्षीय व्यक्तीने लग्न, 'या' कारणाने २२ दिवसातच घटस्फोटाचा अर्ज....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 14:42 IST2020-11-05T14:41:13+5:302020-11-05T14:42:57+5:30
आता Abah ने Noni पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुलीच्या घरचे लोक धक्क्यात आहेत. कारण दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या दिसून येत नव्हती.

बोंबला! १७ वर्षाच्या मुलीसोबत केलं होतं ७० वर्षीय व्यक्तीने लग्न, 'या' कारणाने २२ दिवसातच घटस्फोटाचा अर्ज....
इंडोनेशियात ७८ वर्षीय वयोवृद्ध Abah Sarna ने गेल्यावर्षी १७ वर्षाच्या Noni Navita सोबत लग्न केलं होतं. पण केवळ २२ दिवसातच पतीने पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलाय. वयात असलेल्या अंतरामुळे या कपलची सोशल मीडियावर चांगली चर्चा झाली होती. पण आता Abah ने Noni पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुलीच्या घरचे लोक धक्क्यात आहेत. कारण दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या दिसून येत नव्हती.
नवरीची बहीण Iyan ने मीडियाला सांगितले की, 'मी हे ऐकून धक्का बसला. कारण दोघांमध्ये सगळं काही ठीक सुरू होतं. पण त्यांच्या या अचानक निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आमच्या परिवाराला Abah कडून काहीच समस्या नव्हती. मात्र, Abah च्या परिवाराकडून या लग्नाबाबत समस्या होती.
नवरीवर आरोप लावण्यात आला आहे की, ती लग्नाआधी गर्भवती होती. याच कारणाने ७० वर्षीय Abah ने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नवरीच्या बहिणीने हा आरोपा खोटा आणि चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, Abah ने लग्नावेळी नवरीसाठी ५० हजार रूपये, एक मोटारसायकल आणि गाद्या पाठवण्यात आल्या होत्या. तेच रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, Noni च्या परिवाराकडून हुंड्यात मोठी रक्कम दिली होती.