मुंबई, हावडा मागे पडले! 'या' स्टेशनने रेल्वेला कमावून दिले 3338 कोटी रुपये, कोणतं आहे 'हे' स्टेशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:40 IST2026-05-16T15:39:20+5:302026-05-16T15:40:13+5:30

Highest Earning Railway Station: भारतात ७,३०० पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत, पण कोणतं रेल्वे स्टेशन रेल्वे विभागाला सगळ्यात जास्त कमाई करून देतं?

Indian Railway : Which Is India’s Highest-Earning Railway Station? It Earned Rs 3338 Crore | मुंबई, हावडा मागे पडले! 'या' स्टेशनने रेल्वेला कमावून दिले 3338 कोटी रुपये, कोणतं आहे 'हे' स्टेशन?

मुंबई, हावडा मागे पडले! 'या' स्टेशनने रेल्वेला कमावून दिले 3338 कोटी रुपये, कोणतं आहे 'हे' स्टेशन?

Highest Earning Railway Station: भारताकडे जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात दररोज हजारो गाड्या धावतात आणि ७,३०० हून अधिक रेल्वे स्टेशनमधून कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. दरवर्षी रेल्वे विभागाने किती कमाई केली याची आकडेवारी समोर येत असते. जी थक्क करणारी असते. अनेकांना वाटतं रेल्वेची कमाई फक्त तिकिटांमधून होते. मात्र रेल्वेची कमाई फक्त तिकीटांमधूनच होत नाही, तर स्टेशनवरील जाहिराती, दुकानांचे भाडे, पार्किंग, केटरिंग आणि इतर व्यावसायिक गोष्टींमधूनही मोठा महसूल मिळतो. अशात देशातील सगळ्यात जास्त कमाई करणारं रेल्वे स्टेशन कोणतं हे आज आपण पाहणार आहोत.

सर्वाधिक कमाई करणारं रेल्वे स्टेशन

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं रेल्वे स्टेशन ठरलं आहे. या स्टेशनवरून दररोज सुमारे ३२८ गाड्या धावतात. प्रवासी तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, जाहिराती, होर्डिंग्ज आणि कमर्शियल स्पेसच्या भाड्यातून या स्टेशनची वार्षिक कमाई तब्बल ३३३८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

कमाईत अव्वल असलेली इतर स्टेशन

हावडा जंक्शनची कमाई सुमारे १६९१ कोटी रुपये, चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनची कमाई, १२९९.३१ कोटी रूपये, सिकंदराबाद रेल्वे स्टेशनची कमाई १२७७.३० कोटी रूपये, हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनची कमाई १२२७.२८ कोटी रूपये इतकी आहे.

मुंबई मागे पडली

देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला कमाईच्या यादीत आठवे स्थान मिळालं. या स्टेशनची वार्षिक कमाई साधारण ९८२.२१ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. रोज २४७ गाड्या आणि १८ प्लॅटफॉर्म असूनही हे स्टेशन कमाईत मागे राहिले आहे.

रेल्वेला नेमकी कमाई कुठून होते?

प्रवासी तिकीट

प्लॅटफॉर्म तिकीट

जाहिराती आणि होर्डिंग्ज

दुकानांचे भाडे

पार्किंग फी

ट्रेनमधील केटरिंग

मालवाहतूक

चित्रपटांच्या शूटिंगमधून मिळणारे शुल्क

यामुळे भारतीय रेल्वे ही केवळ प्रवास व्यवस्था नसून मोठी व्यावसायिक प्रणाली म्हणूनही ओळखली जाते.

Web Title : दिल्ली रेलवे स्टेशन कमाई में अव्वल, मुंबई-हावड़ा पीछे!

Web Summary : नई दिल्ली रेलवे स्टेशन टिकट, विज्ञापन और वाणिज्यिक स्थानों से ₹3338 करोड़ सालाना कमाता है, जो सबसे अधिक है। हावड़ा, चेन्नई और सिकंदराबाद इसके बाद हैं। मुंबई का छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ₹982.21 करोड़ के साथ आठवें स्थान पर है। राजस्व यात्री टिकट, प्लेटफ़ॉर्म शुल्क, विज्ञापन और खानपान से आता है।

Web Title : New Delhi Railway Station Tops in Earnings, Leaving Mumbai Behind!

Web Summary : New Delhi is the highest-earning railway station, generating ₹3338 crore annually from tickets, ads, and commercial spaces. Howrah, Chennai, and Secunderabad follow. Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ranks eighth, earning ₹982.21 crore. Revenue comes from passenger tickets, platform fees, advertising, and catering.