कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय राहतात? नाव आणि आकडेवारी वाचून बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:03 IST2026-03-03T16:02:07+5:302026-03-03T16:03:49+5:30
Interesting Facts : बऱ्याच मुस्लिम देशांमध्ये भारतीय राहतात, पण कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय हे आपण आज जाणून घेणार आहोत.

कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय राहतात? नाव आणि आकडेवारी वाचून बसणार नाही विश्वास
Interesting Facts : इराणवर इस्त्राइल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पश्चिम एशियातील स्थिती फारच भयावह झाली आहे. अमेरिका आणि इस्त्राइलची कारवाई, त्याला उत्तर म्हणून इराणने खाडी देशांमध्येही हल्ले केले. अशात लाखो भारतीयांबाबत चिंता वाढली आहे. बऱ्याच मुस्लिम देशांमध्ये भारतीय राहतात, पण कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय हे आपण आज जाणून घेणार आहोत.
कोणत्या मुस्लिम देशात जास्त भारतीय?
पश्चिम एशियातील ज्या देशांमध्ये तणाव वाढलाय, तिथे मोठ्या संख्येत भारतीय लोक काम करतात. आकडेवारीनुसार, सगळ्यात जास्त भारतीय मुस्लिम देश यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमीरातमध्ये राहतात. यूएईमध्ये भारतीयांची संख्या जवळपास ३८.९ लाख ते ४३ लाखांपेक्षा जास्त सांगितली जाते. ही आकडेवारी तेथील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
यूएईनंतर दुसरा नंबर येतो तो सौदी अरेबियाचा. इथे साधारण २६ लाख भारतीय राहतात. कन्स्ट्रक्शन, रिटेल, हेल्थकेअर आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक काम करतात.
खाडी भागातील इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. कुवेतमध्ये साधारण १० ते ११ लाख भारतीय राहतात. कतारमध्ये जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त भारतीय काम करतात. ओमानमध्ये भारतीयांची संख्या ६ ते १३ लाख सांगितली जाते. या सगळ्या देशांमध्ये भारतीय मुख्यपणे श्रमिक, इंजिनिअर, डॉक्टर, नर्स, ड्रायव्हर, सेल्स स्टाफ आणि फायनान्स सेक्टरमध्ये काम करतात.
यूएईला भारतीयांची पहिली पसंती का?
यूएईला भारतीय प्रवाशांचं सगळ्यात मोठं केंद्र मानलं जातं. दुबई आणि अबू धाबीसारख्या शहरात व्यापार आणि नोकरीचे मोठे हब आहेत. टॅक्स व्यवस्था इतर ठिकाणापेक्षा सोपी आहे आणि भारतीयांसाठी व्हिसा प्रक्रियाही स्पष्ट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात इथे भारतीयांचा मोठा सहभाग आहे. हेच कारण आहे की, दरवर्षी हजारो नवीन भारतीय इथे काम करण्यासाठी येतात.