अरे व्वा! रिक्षाचालकाने अनोख्या पद्धतीने साजरा केला लेकीचा वाढदिवस; लोकांचं जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 14:29 IST2023-08-15T12:04:12+5:302023-08-15T14:29:52+5:30

लोक आपला आनंद साजरा करण्यासाठी लाखो आणि करोडो रुपये खर्च करतात, परंतु काही लोक असे आहेत ज्यांना छोट्य़ा छोट्या गोष्टीत आपला आनंद कसा व्यक्त करायचा हे माहीत आहे.

ias officer shares heart touching photo of auto driver story | अरे व्वा! रिक्षाचालकाने अनोख्या पद्धतीने साजरा केला लेकीचा वाढदिवस; लोकांचं जिंकलं मन

अरे व्वा! रिक्षाचालकाने अनोख्या पद्धतीने साजरा केला लेकीचा वाढदिवस; लोकांचं जिंकलं मन

आजच्या काळात लोक आपला आनंद साजरा करण्यासाठी लाखो आणि करोडो रुपये खर्च करतात, परंतु काही लोक असे आहेत ज्यांना छोट्य़ा छोट्या गोष्टीत आपला आनंद कसा व्यक्त करायचा हे माहीत आहे, कारण आनंदाची किंमत लाखो आणि कोटी रुपयांवर अवलंबून नाही, तर ती तुमच्या थोड्या प्रयत्नानेही आणता येते. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहे.

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या @AwanishSharan या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये  "माणसाचं मन मोठं असण्यासाठी खिसा मोठा असण्याची गरज नाही. अर्पिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा' असं म्हटलं आहे. पोस्टमध्ये एक फोटो देखील आहे. ज्यामध्ये 'आज 11/08/2023 रोजी माझी मुलगी अर्पिता यादवचा वाढदिवस आहे. या आनंदात आज माझी रिक्षा फ्री आहे. कोणीच भाडं देऊ नका. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असं लिहिले आहे. 

13 ऑगस्ट रोजी शेअर केलेली ही पोस्ट 4 लाख 29 हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे, तर 21 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. पोस्ट खूप पाहिली जात असून लोकांनी ती खूप आवडतही आहे. ज्या लोकांनी पोस्ट पाहिली आहे ते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: ias officer shares heart touching photo of auto driver story