बायकोचा वाढदिवस विसरले तर होते तुरूंगवासाची शिक्षा, जाणून घ्या कुठे आहे हा अजब कायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:24 IST2021-11-19T13:24:30+5:302021-11-19T13:24:49+5:30
तुम्ही वाढदिवस विसरल्याने बायको नाराज तर झाली असेलच सोबतच अनेक दिवस तुमच्यासोबत बोलली नसेल. पण नशीब समजा की, शिक्षा फारच कमी आहे.

बायकोचा वाढदिवस विसरले तर होते तुरूंगवासाची शिक्षा, जाणून घ्या कुठे आहे हा अजब कायदा
जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला याची कल्पना असेल की, बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवणं किती महत्वाचं असतं. जर तुम्ही बायकोचा वाढदिवस विसरले असाल तर तो दिवस कसा गेला असेल याची अनेकांना कल्पना असेल. तुम्ही वाढदिवस विसरल्याने बायको नाराज तर झाली असेलच सोबतच अनेक दिवस तुमच्यासोबत बोलली नसेल. पण नशीब समजा की, शिक्षा फारच कमी आहे.
बायकोचा वाढदिवस विसरले तर तुरूंगवासाची शिक्षा
जगात एक देश असाही आहे जिथे पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीसाठी फार मोठी समस्या मानली जाते. या देशात पत्नीचा वाढदिवस विसरण्यावर अनोखा कायदा (Forget Wife’s Birthday Law) आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इथे चुकूनही पत्नीचा वाढदिवस विसरले तर पतीला तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
प्रशांत महासागराच्या पॉलिनेशियन भागात सामोआ नावाचा देश आहे. हा आयलॅंड देश आपल्या सुंदरतेसाठी आणि आपल्या अजब कायद्यांसाठी जगभरात चर्चेत असतो. सामोआचा कायदा एका छोट्याशा चुकीसाठीही पतींना तुरूंगात पाठवू शकतो. सामोआच्या कायद्यानुसार, जर एखादा पती चुकूनही आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर तो एक मोठा गुन्हा मानला जातो. त्यानंतर जर पत्नीने तक्रार केली तर पतीला तुरूंगातही जावं लागू शकतं.
असं सांगितलं जातं की, सामोआमध्ये जे पती आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरतात त्यांना पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाते. जर त्यांनी पुन्हा तिच चूक केली तर त्यांना तुरूंगावासाची शिक्षा दिली जाते.