लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला, मग झालं असं काही ज्याची कल्पनाही केली नसेल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 16:14 IST2023-02-21T15:55:37+5:302023-02-21T16:14:12+5:30
Crime News : या घटनेनंतर आरोपींविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या वडिलांना आणि भावाला फोन करून सासरी बोलवलं.

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला, मग झालं असं काही ज्याची कल्पनाही केली नसेल....
Marriage Anniversary : गमती गमतीत आपण नेहमीच हे म्हणत असतो की, जर लग्नाचा वाढदिवसाला पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरले तर धिंगाणा होऊ शकतो. अशीत एक घटना मुंबईच्या घाटकोपरमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला शुभेच्छा दिल्या नाही तर पत्नी चांगलीच संतापली. त्यानंतर तिने वडील आणि भावासोबत मिळून पती आणि सासू दोघांचीही धुलाई केली. दोघेही या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर आरोपींविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या वडिलांना आणि भावाला फोन करून सासरी बोलवलं. त्यानंतर तिने त्यांना सांगितलं की, पतीने लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या नाहीत. हे ऐकून तिचे वडील आणि भाऊ संतापले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून महिलेचा पती आणि सासूला मारहाण सुरू केली. यावेळी त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनुसार, हल्ल्यात सहभाही चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय विशाल नांगरे एका कुरिअर कंपनीमध्ये ड्राइव्हरची नोकरी करतो. तर त्याची पत्नी एका खाण्याच्या आउटलेटमध्ये काम करते. दोघेही घाटकोपरच्या बॅंगनवाडीमध्ये राहतात. पाच वर्षाआधी 2018 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. ही घटना याच महिन्यात 18 तारखेला घडली. तक्रारीववरून पत्नी, तिचे वडील आणि भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.