OMG: पिकनिकसाठी गेलेल्या परिवाराने जसा उघडला कारचा दरवाजा, जे दिसलं ते पाहून बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 03:27 PM2021-12-03T15:27:06+5:302021-12-03T15:29:24+5:30

ऑस्ट्रेलियातील एक सर्पमित्राने ज्याचं नाव जोश कॅसल आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लांबलचक कॅप्शन लिहिलं आहे.

Huge python was seen wrapped in the mirror inside the car of a family who gone for picnic | OMG: पिकनिकसाठी गेलेल्या परिवाराने जसा उघडला कारचा दरवाजा, जे दिसलं ते पाहून बसला धक्का

OMG: पिकनिकसाठी गेलेल्या परिवाराने जसा उघडला कारचा दरवाजा, जे दिसलं ते पाहून बसला धक्का

googlenewsNext

जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत काममध्ये बसून कुठे फिरायला जात असाल आणि तुमच्या कारमध्ये एक खतरनाक अजगर दिसला तर तुम्हाला कसं वाटेल? अर्थातच बोलती बंद होईल आणि थरकाप उडेल. असंच काहीसं ऑस्ट्रेलियात (Australia) राहणाऱ्या एका परिवारासोबत झालं. या घटनेनंतर संपूर्ण परिवाराला धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियातील एक सर्पमित्राने ज्याचं नाव जोश कॅसल आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लांबलचक कॅप्शन लिहिलं आहे. यात त्याने या घटनेची पूर्ण माहिती दिली. त्याने लिहिलं की, 'असं केवळ ऑस्ट्रेलियातच होतं. तुम्ही तुमच्या कारजवळ परत याल तर तुम्हाला कारच्या आजूबाजूला किंवा काचावर अजगर दिेसेल'.

त्याने सांगितलं की, हा  परिवार पिकनिकसाठी आला होता. यादरम्यान ड्रायव्हरने कार थंड करण्यासाठी एक खिडकी उघडू ठेवून गेला होता. जेव्हा हे लोक परत आले तेव्हा त्यांना कारच्या काचेच्या चारही बाजूने अजगर गुंडाळी मारलेला दिसला. हे पाहून परिवाराला धक्का बसला. 

भलेही भारतात भरपूर साप आढळतात. पण सापाच्या दंश मारण्याच्या घटना जगात सर्वात जास्त अमेरिकेत  समोर येतात. अमेरिकेत उपचार चांगले असल्याने लोकांचा जीव वाचतो. WHO नुसार, जगभऱात दरवर्षी सापाने दंश मारल्याच्या ५० लाख घटना घडतात. यातील १ लाख लोकांचा मृत्यू होतो. सापाची दंश मारण्याची दोन पद्धती असतात. एक ड्राय बाइट आणि दुसरा विषारी बाइट. विषारी बाइट म्हणजे साप व्यक्तीच्या शरीरात विष सोडतो.
 

Web Title: Huge python was seen wrapped in the mirror inside the car of a family who gone for picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.