एखादा साप हा किती वर्षांचा आहे, त्याचं वय किती हे कसं ओळखता येतं? पाहा कशी मिळते माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:56 IST2026-01-03T14:56:02+5:302026-01-03T14:56:37+5:30
Interesting Facts : एक महत्वाचा विषय म्हणजे सापांचं आयुष्य किंवा त्यांचं वय. एखाद्या सापाचं वय किती आहे हे कसं ओळखावं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. त्याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

एखादा साप हा किती वर्षांचा आहे, त्याचं वय किती हे कसं ओळखता येतं? पाहा कशी मिळते माहिती
Interesting Facts : साप हा पृथ्वीवरील एक असा जीव आहे ज्याबाबत सर्वसामान्य लोक आणि वैज्ञानिकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. वैज्ञानिक सतत सापांवर संशोधन करत असतात. ज्यातून त्यांच्याबाबत नवनवीन गोष्टी समोर येत असतात. असाच एक महत्वाचा विषय म्हणजे सापांचं आयुष्य किंवा त्यांचं वय. एखाद्या सापाचं वय किती आहे हे कसं ओळखावं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. त्याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
देशात सापांच्या जवळपास 270 प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती गार्डन स्नेकच्या असतात. ज्या रहिवाशी भागात आढळतात. काही जंगलांमध्ये आढळतात. हे फार कमी दिसतात. ठिकाणांनुसार प्रत्येक सापांचं वय वेगळं असतं.
किती असतं सापांचं जीवन?
सापांच्या वयाबाबत एक्सपर्ट सांगतात की, जे जंगलात राहतात किंवा लोकांच्या वस्तीत राहतात जिथे लोकांची वर्दळ जास्त असते. तिथे राहणाऱ्या सापांचा मृत्यू लवकर होतो. असे साप 8 ते 10 वर्षापर्यंत जिवंत राहतात. पण कॉमन करेत, कोब्रा, रसेल वायपर, सॉ-स्केल्ड वायपरसारख्या सापांचं वय जास्त असतं. ते 15 वर्षापेक्षा अधिक जगतात.
जगभरात सापांच्या ३ हजार ते ३,९०० प्रजाती आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, सापांच्या जगात ३७८९ प्रजातती आहेत. प्रत्येक प्रजातीची जीवनशैली वेगळी असते. काहींचा जगण्याचा कालावधी सुद्धा वेगवेगळा असतो.
सगळ्यात जास्त जगणारे साप
जेव्हा सगळ्यात जास्त जगणाऱ्या सापांचा विषय निघतो तेव्हा अजगराचं नाव सगळ्यात वर असतं. अजगरही सापांची एक प्रजाती आहे. अजगरांमध्ये विष नसतं. पण त्यांची पकड इतकी मजबूत असते की, मनुष्याचा जीव निघून जातो. अजगर 25 ते 40 वर्ष जगतात.
कसं समजतं त्यांचं वय?
एक्सपर्टनी सांगितलं की, सामान्यपणे कोणताही साप पाहून त्याचं वय सांगता येत नाही. पण त्यांचा आकार, त्वचा आणि चमक यांच्या आधारावर त्यांच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. यांच्यात एका काळानंतर वयाची माहिती मिळवणं अवघड होतं. कारण मनुष्यासारखी सापांचीही लांबी एका वयानंतर वाढणं बंद होतं. ते साप आपली त्वचा बदलत राहत असतात.