बुर्ज खलिफा स्वच्छ करण्यासाठी किती दिवस लागतात? दिवसांचा आकडा वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:26 IST2026-01-08T16:24:44+5:302026-01-08T16:26:41+5:30

Burj Khalifa Interesting Facts : जगातल्या सगळ्यात उंच इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश आहे. त्यामुळे या इमारतीची बाहेरील स्वच्छता करण्यासाठी किंवा बाहेरच्या काचा धुण्या-पुसण्यासाठी किती वेळ लागत असेल?

How much time is taken to clean Burj Khalifa | बुर्ज खलिफा स्वच्छ करण्यासाठी किती दिवस लागतात? दिवसांचा आकडा वाचून बसणार नाही विश्वास

बुर्ज खलिफा स्वच्छ करण्यासाठी किती दिवस लागतात? दिवसांचा आकडा वाचून बसणार नाही विश्वास

Burj Khalifa Interesting Facts : जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. का राहणार नाही म्हणा...यात गोष्टीच इतक्या आश्चर्यकारक आणि आकर्षक आहेत की, चर्चा तर होणारच...ही इमारत बघण्यासाठी जगभरातील पर्यटक इथे येतात. दुबईची शान असलेली ही इमारत 829.8 मीटर उंच आहे. जगातल्या सगळ्यात उंच इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश आहे. त्यामुळे या इमारतीची बाहेरील स्वच्छता करण्यासाठी किंवा बाहेरच्या काचा धुण्या-पुसण्यासाठी किती वेळ लागत असेल? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत.

इमारत बांधण्याचा खर्च

बुर्ज खलिफा या इमारतीचं बांधकाम काम 2004 मध्ये सुरू झालं होतं. ही इमारत बनवण्यासाठी दररोज 12 हजारांपेक्षा जास्त मजूर काम करत होते. ही इमारत तयार करण्यासाठी A380 विमानाइतकं अॅल्यूमिनिअम आणि एक लाख हत्तींच्या वजनाचं कॉन्क्रीट वापरण्यात आलं. त्याशिवाय ही इमारत तयार करण्यासाठी अंदाजे 1.5 अब्ज डॉलर खर्च करण्यात आला होता. ही इमारत तयार होण्यासाठी पूर्ण 5 वर्षे लागली. ही इमारत 2009 मध्ये तयार झाली आणि 2010 मध्ये सगळ्यांसाठी खुली करण्यात आली होती.

बुर्ज ख़लिफामध्ये एकूण 163 मजले आहेत. याच्या 154व्या फ्लोरवर जगतील सगळ्यात उंच Bar आणि Lounge आहे. तसेच यात 58 लिफ्ट, 2957 पार्किंग स्पेस, 304 हॉटेल, 37 ऑफिस फ्लोर आणि 900 अपार्टमेंट आहेत.

किती दिवस लागतात आणि किती खर्च येतो?

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, बुर्ज खलिफा इमारतीचा बाहेरचा भाग 26 हजार काचांनी झाकलेला आहे. हे काच धुण्यासाठी आणि पुसण्यासाठी साधारण 3 महिन्यांचा वेळ लागतो. या टॉवरची सफाई वर्षातून चारदा केली जाते. म्हणजे वर्षभर सफाई सुरू राहते. एका रिपोर्टनुसार बुर्ज खलिफाची मेन्टेनन्स कॉस्ट ही साधारण 100 ls 115 कोटी रूपये इतकी आहे. यातून सफाईचा खर्च केला जातो. साधारण 300 कर्मचारी टॉवरची आतील सफाई करतात, तर बाहेरची सफाई 36 कर्मचारी करतात.

7 वर्ल्ड रेकॉर्ड

जगातील सगळ्यात उंच इमारत असल्याने या इमारतीच्या नावावर 7 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. वाचून हैराण व्हाल की, बुर्ज खलिफा ही इमारत तुम्ही 95 किमी दूर अंतरावरूनही बघू शकता. अनेकांना हे माहीत नसेल की, आधी या इमारतीचं नाव बुर्ज दुबई किंवा खलिफा टॉवर ठेवण्यात आलं होतं. नंतर ते बदलून बुर्ज ख़लिफा करण्यात आलं.

Web Title : बुर्ज खलीफा की सफाई: समय, लागत और रोचक तथ्य

Web Summary : दुबई की शान बुर्ज खलीफा के 26,000 कांच के पैनलों को साफ करने में तीन महीने लगते हैं। साल में चार बार सफाई होती है, जिसकी लागत लगभग ₹100-115 करोड़ है। पांच वर्षों में निर्मित, इसमें सात विश्व रिकॉर्ड और 163 मंजिलें हैं।

Web Title : Burj Khalifa Cleaning: Time, Cost, and Interesting Facts Revealed

Web Summary : Burj Khalifa, Dubai's pride, takes three months to clean its 26,000 glass panels. Cleaned four times annually, maintenance costs about ₹100-115 crore. Built in five years with massive resources, it holds seven world records and has 163 floors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.