नीता अंबानी शाळेत जातांना त्यांच्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायच्या? तुमचा विश्वास बसणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:47 IST2021-02-01T12:46:55+5:302021-02-01T12:47:50+5:30
ईशा, आकाश आणि अनंत अंबानी शाळेत जात असताना त्यांना किती पॉकेट मनी दिली जात होती.

नीता अंबानी शाळेत जातांना त्यांच्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायच्या? तुमचा विश्वास बसणार नाही...
जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेल्या व्यक्तीच्या घरात जन्माला येणं नशीबाची गोष्ट आहे. म्हणूनच लोक म्हणतात की, जे श्रीमंताच्या घरी जन्म घेतात त्यांचं आयुष्य सर्वात भारी असतं. पण मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या मुलांबाबत असं नव्हतं. तुम्ही कधी विचार केलाय का की, ईशा, आकाश आणि अनंत अंबानी शाळेत जात असताना त्यांना किती पॉकेट मनी दिली जात होती. नीता अंबानी यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, त्या मुलांना ५ रूपये देत होत्या.
देशातील सर्वात श्रीमंत परिवार असला तरी अंबानी यांनी आपल्या मुलांना मीडिल क्लास व्हॅल्यूजसोबत वाढवलं आहे. २०११ मध्ये एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता की, त्या त्यांच्या मुलांना खर्चासाठी किती पैसे देत होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, 'जेव्हा माझी मुले लहान होती तेव्हा मी त्यांना दर शुक्रवारी ५ रूपये देत होते. जेणेकरून ते ते पैस शाळेतील कॅन्टीनमध्ये खर्च करतील. एका दिवस माझा लहान मुलगा अनंत माझ्या बेडरूममध्ये आला आणि मला १० रूपये मागू लागला'.
त्यांनी पुढे सांगितले की, 'जेव्हा मी त्याला विचारले की, १० रूपये कशासाठी हवेत. तेव्हा तो म्हणाला की, जेव्हा तो ५ रूपयांचं नाणं शाळेतील मित्रांना दाखवतो तेव्हा ते त्याच्यावर हसतात आणि त्याला म्हणतात की, 'तू अंबानी आहे की, भिकारी'. हे ऐकून नीता अंबानी आणि मुकेश अंबानी दोघांनाही हसू आलं होतं.
मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्न करण्याआधी नीता अंबानी यांना शिक्षिका होण्याची इच्छा होती. लग्नानंतर त्यांनी कुटूंबाची जबाबदारी घेतली. त्यांनी मुलाखतीत त्यांच्या पालन पोषणाबाबत सांगितले. त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे त्यांची आई शिस्तप्रिय होती. त्यामुळे त्यांना वर्षातून केवळ ४ वेळाच बाहेर जायला मिळायचं आणि त्यांना पॉकेट मनीही मिळत नव्हती.