हत्तीला दोनच दात असतात असं वाटत असेल तर चुकताय, मग हत्तीला दात असतात तरी किती? बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:56 IST2026-01-07T12:36:00+5:302026-01-07T12:56:47+5:30
Elephant Interesting Facts : हत्तीचे मोठाले दात आपण अनेकदा प्रत्यक्षात, व्हिडिओत किंवा सिनेमात पाहिले असतीलच. पण हत्तीला खाण्यासाठी किती दात असतात हे आपल्याला माहीत आहे का?

हत्तीला दोनच दात असतात असं वाटत असेल तर चुकताय, मग हत्तीला दात असतात तरी किती? बसणार नाही विश्वास
Elephant Interesting Facts : पृथ्वीवर कोट्यावधी जीव आहेत आणि प्रत्येकाची काहीना काही खासियत असते. त्यांची जगण्याची पद्धत, खाणं-पिणंही वेगळं असतं. जास्तीत जास्त प्राणी हे जंगलात राहतात, तर काही प्राणी हे पाळिव असतात. जंगलातील सगळ्यात शक्तीशाली प्राणी कोण? असं विचारलं तर कुणीही पटकन हत्ती असं सांगतील. हा एक असा प्राणी आहे ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होत असेल. हत्तीला धार्मिक महत्वही आहे. सोबतच हत्तीचं दिसणं-वागणं कुणालाही आकर्षित करतं. लांबलचक सोंड, पडद्यांसारखे मोठाले कान, भलंमोठं शरीर आणि खासकरून तोंडातून बाहेर आलेले दोन पांढरे मोठाले दात. जे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. पण आपल्याला कल्पना नसेल की, हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात.
हत्तीचे मोठाले दात आपण अनेकदा प्रत्यक्षात, व्हिडिओत किंवा सिनेमात पाहिले असतीलच. पण हत्तीला खाण्यासाठी किती दात असतात हे आपल्याला माहीत आहे का? जर आपल्याला हे माहीत नसेल तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
हत्तीला किती दात असतात?
आपण अनेकदा हत्तीचे मोठे दात पाहिले असतील. या दातांच्या मदतीने मोठाली लाकडं किंवा काहीतरी वस्तू उचलतानाही पाहिलं असेल. पण हत्तीचे खायचे दात फार कुणी पाहिले नसतील आणि किती असतात हेही अनेकांना माहीत नसेल. तर हत्तीला एकूण २६ दात असतात. त्यातील दोन मोठे दात बाहेर असतात. म्हणजे हत्तीला काही खाण्यासाठी २४ तास असतात. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, हत्तींच्या पूर्ण जीवनात त्यांचे २४ दात ६ सेट्समध्ये बदलतात. प्रत्येकवेळी नवीन मागून नवीन दात पुढे येतात आणि जुने दात निघून जातात. याने त्यांना काही खाण्यात चांगली मदत मिळते.
हत्तीच्या बाहेरच्या दातांना काय म्हणतात?
हत्तींचे बाहेर दिसणारे दात नेहमीच चर्चेत असतात. या दातांची मोठी तस्करी केली जाते. ज्यासाठी हत्तींचा जीवही घेतला जातो. पण आपल्याला माहीत आहे का की, हत्तीच्या या बाहेरच्या दातांना काय म्हणतात? तर हत्तींच्या या मोठ्या दातांना हस्तीदंत किंवा गजदंत म्हणतात. या दातांचा वापर हत्ती खोदण्यासाठी, जेवण जमा करण्यासाठी आणि स्वत:ची रक्षा करण्यासाठी करतात.
किती असतं हत्तींचं आयुष्य?
मीडिया रिपोर्टनुसार, सामान्यपणे हत्ती ५० ते ७० वर्षापर्यंत जीवंत राहतात. काही केसेसमध्ये हत्ती ८० वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळ जगतात. हत्तींचं आयुष्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. ज्यात प्रजाती, ठिकाण, आरोग्य आणि देखरेख यांचा समावेश आहे. हत्ती हे फारच सामाजिक प्राणी असतात. ते परिवारात राहतात आणि एकमेकांची काळजी घेतात. ही सामाजिक संरचना त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी मदत करते.
हत्ती एकमेकांना नावाने हाक मारतात
हत्ती एकमेकांना नावाने हाक मारत असल्याचा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. रिसर्चमधून समोर आलं की, मनुष्यांप्रमाणे हत्तींना सुद्धा नावं असतात. या नावांचा वापर कळपातील सदस्य एकमेकांना संबोधित करण्यासाठी करतात. खास बाब ही आहे की, ही नावे मनुष्यांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नावांशी मिळती जुळती असतात. हत्ती एकमेकांना हाक मारण्यासाठी एक खास प्रकारचा आवाज काढतात. हा आवाज तीन प्रकारचा असतो. पहिला आवाज कळपातून हरवलेल्या हत्तीला शोधण्यासाठी, दुसरा इतर सदस्यांच्या अभिवादनासाठी आणि तिसरा पिल्ल्यांची देखरेख करण्यासाठी काढला जातो.