शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तेल जमिनीखाली तयार तरी कसं होतं आणि ते काही ठिकाणीच का आढळतं? समजून घ्या पूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:49 IST

Oil Formation : तेल किंवा पेट्रोल फक्त काही ठरावितक जागेंवरच का आढळतं आणि ते जमिनीखाली कसं तयार होतं? आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडले असतील. समजून घेऊया तेल तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया.

Oil Formation : मध्यपू्र्वेत इराण, अमेरिका - इस्त्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे काही देशांमध्ये तेलाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. अनेक देशांचा तेल पुरवठा बंद झालाय. अशात इराण, सौदीसारख्या इतरही तेल समृद्ध देशांमधील तेलाबाबत चर्चा सुरू झाली. अनेकांना प्रश्न पडलेत की, तेल किंवा पेट्रोल फक्त काही ठरावितक जागेंवरच का आढळतं आणि ते जमिनीखाली कसं तयार होतं? आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडले असतील. अशात आज आपण जमिनीखाली तेल तयार होण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. 

जमिनीखाली तेल कसं तयार होतं?

जमिनीत तेल येतंच कुठून?तेल जमिनीत काही ठिकाणीच का तयार होतं? असे प्रश्न पडणं साहजिक आहे. मुळात तेल तयार होण्याची प्रक्रिया ही खूप काळ चालणारी आणि हळूवार अशी असते. जमिनीखाली तेल तयार होण्याच्या प्रक्रियेला जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जुन्या वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष जमिनीखाली दाबले जाऊन तयार झालेले इंधन. साधारण ३० ते ४० कोटी वर्षांआधी प्लँकटनसारखे सूक्ष्म जीव आणि समुद्री वनस्पती नष्ट झाल्या. हे समुद्राच्या तळाशी जमा झाले. काळानुसार त्यांवर चिखल, वाळूचा थर जमा झाला. 

जसजसा या अवशेषांवर वेगवेगळ्या गोष्टींचा थर वाढत गेला, दबाव अधिक वाढत गेला. यात पृथ्वीच्या आतील उष्णतेने देखील महत्वाची भूमिका बजावली. ऑक्सीजन नसल्याने उष्णता आणि दबावामुळे हळूहळू दबलेले जैविक पदार्थ हायड्रोकार्बनमध्ये रूपांतरित झाले. मग यापासून तयार झालं कच्चं तेल. पण ही प्रक्रिया काय सहज होत नाही. यासाठी लाखो वर्ष लागतात. हेच कारण आहे की, एकदा वापरल्यानंतर तेल पुन्हा लवकर तयार केलं जाऊ शकत नाही.

काही ठिकाणांवरच का आढळतं तेल?

१) आपल्याला माहीत असेल की, तेल पृथ्वीवर सगळीकडे सापडत नाही. काही मोजक्याच ठिकाणांवर तेल सापडतं. मुळात तेल तयार होणं हे तीन भूवैज्ञानिक स्थितींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असे दगड असले पाहिजे, ज्यात जैविक पदार्थांचं प्रमाण अधिक असेल. जर ते नसतील तर तेल अजिबात तयार होणार नाही. 

२) दुसरी गोष्टी म्हणजे जिथे तेल असतं तिथे जमिनीखाली जाळ्यासारखी संरचना असते. तेल हे पाण्यापेक्षा हलकं असतं, त्यामुळे ते नॅचरली दगडांमधून वरच्या दिशेने येतं. ते खाली तळात जाण्यापासून रोखण्यासाठी देखील दगडांचा असा थर हवा जो पाण्यालाही बाहेर येऊ देणार नाही.

३) तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भागाचा इतिहास. म्हणजे आधी तिथे महासागर असल्याचा इतिहास हवा. आज ज्या ज्या ठिकाणी तेल आढळतं म्हणजे मध्य पूर्वेतील बरेच देश हे पूर्वी समुद्राने झाकलेले होते. पुढे टेक्टॉनिक हालचालींमुळे येथील भूभाग बदलला आणि वाळवंट झाला. 

जमिनीखाली कसं जमा होतं तेल? 

इथे समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की, तयार झाल्यानंतर तेल एकाच जागी थांबत नाही. ते हळूहळू जमिनीखालील दगडांमधून वाहत राहतं, जोपर्यंत ते जमिनीखालील भांडारात पोहोचत नाही. म्हणजे तेल जमिनीखाली एका नॅचरल टाकीमध्ये जमा होतं.  

कुठे कुठे तेल?

जगभरात व्हेनेजुएला, सौदी अरेबिया, रशिया आणि इराकसारख्या देशांकडे तेलांचा सगळ्यात मोठा भांडार आहे. भारतात तेल राजस्थानच्या बाडमेर, गुजरातच्या खंभात, मुंबई हाय, आसाममध्ये डिगबोई आणि कृष्णा गोदावरी बेसिनसारख्या भागांमध्ये आढळतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Oil Formation: How it Happens Underground and Why Specific Locations?

Web Summary : Oil forms from ancient organic matter under pressure and heat over millions of years. Specific geological conditions, including source rocks, trap formations, and a history of marine environments, are essential for oil accumulation in certain regions like the Middle East and parts of India.
टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके