"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 02:34 PM2024-05-25T14:34:28+5:302024-05-25T14:45:04+5:30

26 वर्षीय Rachel Standfest ने तिची मुलगी Brynlee च्या पहिल्या वाढदिवशी मुलीच्या जन्मासंबंधीचा एक किस्सा शेअर केला आहे. 

horrible survival story of 36 weeks pregnant mom who leapt from 20 foot high window escape fire | "कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...

"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...

डॉक्टर गर्भवती महिलांना धावपळीचं किंवा जड काम न करण्याचा सल्ला देतात. याशिवाय, झोपताना आणि पायऱ्या चढताना काळजी घेण्याचा देखील सल्ला दिला जातो. महिलाही विशेष काळजी घेतात. याच दरम्यान एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मिशिगनमधील 26 वर्षीय Rachel Standfest ने तिची मुलगी Brynlee च्या पहिल्या वाढदिवशी मुलीच्या जन्मासंबंधीचा एक किस्सा शेअर केला आहे. 

Rachel ने सांगितलं की, जेव्हा ती 36 आठवड्यांची म्हणजेच 8 महिन्यांची गरोदर होती, तेव्हा मध्यरात्री अचानक तिच्या घराला आग लागली. "मध्यरात्री अचानक मला पायऱ्या चेक कराव्या असं वाटलं. मी पाहिलं तेव्हा फक्त धूर दिसत होता. मी धावत गेले, माझा पती ट्रेविसला उठवलं आणि माझ्या आईला फोन केला. मला शेवटची गोष्ट आठवते ती म्हणजे ट्रेविस खिडकी तोडत आहे आणि माझी आई रस्त्यावर उभी राहून आम्हाला बाहेर पडायला सांगत होती."

"ट्रेविस मला खिडकीतून खाली नीट उतरवण्याचा प्रयत्न करत होता पण आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो आणि आम्हाला 20 फूट खाली जायचं होतं. जीवन-मरणाची परिस्थिती होती आणि मला समजलं होतं की मला जिवंत राहायचं असेल तर मला उडी मारावी लागेल आणि त्यामुळे मी खाली उडी मारली. मला फ्रॅक्चर झालं" असं Rachel ने म्हटलं आहे. 

ट्रेविस आगीतून खाली उतरला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आणि Rachel वर शस्त्रक्रिया करावी लागली. थर्ड डिग्री बर्न असूनही डॉक्टरांना तिचं ऑपरेशन करावं लागलं. 15 ते 20 सेकंदानंतर मुलीचा जन्म झाला. परिस्थिती त्यानंतर गंभीर होती.

मुलगी चमत्कारिकरित्या निरोगी जन्मली होती आणि तिला आग किंवा तिच्या आईच्या 20 फूट उडी मारल्यामुळे काहीही झालं नाही. आग लागण्याच्या काही आठवड्यांपूर्वी या कपलने मुलीचं नाव ब्रिनली असं नाव ठरवलं होतं. पण नंतर कळलं की, हा एक जुना इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ 'जळलेली गोष्ट' असा होता. 

Rachel सुमारे एक महिना रुग्णालयात राहिली, तर ट्रेविसला एका आठवड्यानंतर घरी पाठवण्यात आलं. मित्र आणि कुटुंबीयांनी केलेल्या मदतीनंतर, Rachel आणि ट्रेविस म्हणतात की, "आम्ही आणि आमची मुलगी जिवंत आहोत यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहेत."
 

Web Title: horrible survival story of 36 weeks pregnant mom who leapt from 20 foot high window escape fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.