मनी हाइस्टच्या ‘Bella Ciao’ चं देसी व्हर्जन ऐकलंय का ? पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 17:24 IST2021-09-26T17:19:49+5:302021-09-26T17:24:30+5:30
मनी हाइस्ट वेब सीरिजमधील हे गाणं जगभर आवडीने ऐकलं जातं.

मनी हाइस्टच्या ‘Bella Ciao’ चं देसी व्हर्जन ऐकलंय का ? पाहा व्हिडिओ
मनी हाइस्ट या वेब सीरिजचे जगभर चाहते आहेत. या वेब सीरिजचे अनेक भाग असून, लवकरच याचा अखेरचा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या वेब सिरीजमधील एक प्रचंड गाजलय. या गाण्याचं नाव 'बेला चावो' आहे. हे गाणं रिजील होऊन बरेच दिवस झाले, तरीदेखील सध्या हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं 'बेला चावो' गाणं ओरिजीनल नसून, एका भारतीय कलाकारने गायलेलं 'बेला चावो'चं देसी व्हर्जन आहे. एक गुजराती कलाकार हार्मोनियमवर मोठ्या उत्साहात गुजराती भाषेत हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याच्या तालावर समोर बसलेले प्रेक्षकही थिरकत आहेत. आपल्या आगळ्या-वेगळ्या आवाजात गायलेलं हे गाणं सध्या चांगलंच व्हायरल केलं जात आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटीझन्स या गाण्यावर विविध कमेंट्स करत आहेत. एका यूझरने कमेंट केली, 'हे देसी व्हर्जन मूळ स्पॅनिश गाण्यापेक्षा चांगलं आणि मजेशी आहे.'