प्रेयसीच्या बहिणीसोबतही सुरू होतं त्याचं अफेअर, गर्लफ्रेंडने चपलेने काढली त्याची आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 10:44 AM2023-04-25T10:44:28+5:302023-04-25T10:45:36+5:30

ती तर बॉयफ्रेंडचं शर्ट काढून त्याची धिंडही काढणार होती. पण लोकांनी तिला समजावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 एप्रिल दुपारची आहे.

Gwalior girlfriend beats boyfriend with slippers publicly video went viral | प्रेयसीच्या बहिणीसोबतही सुरू होतं त्याचं अफेअर, गर्लफ्रेंडने चपलेने काढली त्याची आरती

प्रेयसीच्या बहिणीसोबतही सुरू होतं त्याचं अफेअर, गर्लफ्रेंडने चपलेने काढली त्याची आरती

googlenewsNext

ग्वाल्हेरमध्ये एका तरूणाला दोन बहिणींसोबत फ्लर्ट करणं चांगलंच महागात पडलं. भिंड येथे राहणारा तरूण एका तरूणीवर प्रेम करत होता. प्रेयसीसोबतच तो तिच्या नातेवाईक बहिणीसोबतही फ्लर्ट करत होता. याचा पत्ता त्याच्या प्रेयसीला लागला होता. तर तिने त्याला पार्कमध्ये बोलवलं. त्यानंतर तिने त्याला चपलेने चांगलाच चोप दिला. ती तर बॉयफ्रेंडचं शर्ट काढून त्याची धिंडही काढणार होती. पण लोकांनी तिला समजावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 एप्रिल दुपारची आहे.

रविवारी दुपारी काही जेव्हा ग्वाल्हेरच्या झलकारी बाई पार्कजवळून जात होते तेव्हा एका तरूणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून हैराण झाले. लोकांनी पार्कमध्ये जाऊन पाहिलं तर एक तरूणी एका तरूणाला चपलेने मारत होती. अशात तिथे बघणाऱ्या लोकांची मोठी गर्दी झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणाचं नाव जितेंद्र आहे. त्याला मारहाण करणारी दुसरी कुणी नसून त्याची दूरची नातेवाईक आणि प्रेयसी आहे. जितेंद्रने दगा दिल्यावर ती नाराज होऊन त्याला मारहाण करत होती. हा सगळा ड्रामा पार्कमध्ये साधारण अर्धा तास सुरू होता. तरूणीची त्याची धिंडही काढणार होती. पण लोकांनी तिला समजावलं. 

जितेंद्र या तरूणीवर प्रेम करत होता. दोघेही फोनवर बोलत होते. पण काही दिवसांआधी समजलं की, जितेंद्र प्रेयसीची नात्याने बहीण लागणाऱ्या तरूणीसोबतही फ्लर्ट करत आहे. जेव्हा दोन्ही बहिणी एकमेकींसोबत बोलल्या तेव्हा जितेंद्रचा भांडाफोड झाला. जितेंद्र दोन्ही बहिणींची फसवणूक करत होता. तो त्यांच्यासोबत मोबाइलवर बोलत होता आणि प्रेमाचा दावा करत होता. त्याचा भांडाफोड झाल्यावर  दोन्ही बहिणींनी त्याला सगळ्यांसमोर धडा शिकवण्याचा प्लान केला.

प्रेयसीने फोन करून जितेंद्रला पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. तो पार्कमध्ये पोहोचला तेव्हा तरूणीने त्याला चांगलाच धडा शिकवला. यावेळी दोन्ही बहिणी तिथे उपस्थित होत्या. यादरम्यान कुणीतरी या घटनेची सूचना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सगळे तिथून निघून गेले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: Gwalior girlfriend beats boyfriend with slippers publicly video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.