कानात झुरळ गेल्यामुळे झाला कायमचा बहिरा, थेट कोर्टात घेतली धाव...कशासाठी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:54 PM2022-04-13T16:54:30+5:302022-04-13T16:55:01+5:30

हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान टॉड व्हॅनसिकल नावाच्या एका व्यक्तीची श्रवणशक्तीच गेली. हॉटेलच्या खोलीत झुरळं होती, जे झोपेत असताना त्याच्या कानात गेले (Cockroach Entered in a Ear of a Man While Sleeping), त्यानंतर तो बहिरा झाला. या घटनेनंतर टॉडने हॉटेलविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे.

Guest Sues Hotel After Cockroach Crawls Into his Ear, Causes Hearing Loss | कानात झुरळ गेल्यामुळे झाला कायमचा बहिरा, थेट कोर्टात घेतली धाव...कशासाठी? वाचा सविस्तर

कानात झुरळ गेल्यामुळे झाला कायमचा बहिरा, थेट कोर्टात घेतली धाव...कशासाठी? वाचा सविस्तर

Next

कोणत्याही हॉटेलची रेटिंग (Hotel Rating) त्यांची सर्व्हिस, स्वच्छता आणि सहकार्याच्या आधारावरच ठरवली जाते. हॉटेलमध्ये राहणारी व्यक्ती साधारणतः तिथे चांगली स्वच्छता असेल असंच गृहीत धरते. असंच गृहीत धरून हॉटेलमध्ये गेलेल्या एका व्यक्तीला एवढी मोठी किंमत चुकवावी लागली की आता न्याय मागण्यासाठी त्याने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

अमेरिकेतील साउथ कॅरोलिनामध्ये ओहायो शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत ही घटना घडली आली. अशी घटना कदाचित याआधी कोणीही ऐकली किंवा पाहिली नसेल. यात हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान टॉड व्हॅनसिकल नावाच्या एका व्यक्तीची श्रवणशक्तीच गेली. हॉटेलच्या खोलीत झुरळं होती, जे झोपेत असताना त्याच्या कानात गेले (Cockroach Entered in a Ear of a Man While Sleeping), त्यानंतर तो बहिरा झाला. या घटनेनंतर टॉडने हॉटेलविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे.

दक्षिण कॅरोलिनातील मार्टल बीच येथील सँड्स ओशन क्लबमध्ये ही घटना उघडकीस आली. हॉटेलने स्वच्छतेकडे लक्ष न देणं, कीटकनाशकांची फवारणी योग्य प्रकारे न करणं यासह इतर अनेक प्रकरणांमध्ये घोर निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी टॉडला याचा भरपूर त्रास झाला. झुरळ कानात गेल्यानंतर टॉडला तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि नंतर त्याला काही ऐकू येणंही बंद झालं. टॉडने कोर्टात सांगितलं की ऐकण्याची क्षमता गमावल्याने कशाप्रकारे त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर परिणाम झाला आहे.

डेलीस्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, टॉड व्हॅन्सिकल सॅन्ड्स हॉटेलचे संचालन करणाऱ्या ओशन क्लब होमओनर्स असोसिएशन आणि ओशन अॅनीज ऑपरेशन्स इंक यांच्या विरोधात खटला दाखल करत आहे. त्याच्या कानाच्या उपचाराचा खर्चही त्यांना करावा लागणार आहे. टॉडने सांगितलं की, झुरळ कानात गेल्यावर त्याला खूप वेदना झाल्या आणि तो प्रचंड घाबरला. आता ऐकू येत नसल्याने त्याला घरातील आणि प्रोफेशनल कामातही अडचणी येत आहेत

Web Title: Guest Sues Hotel After Cockroach Crawls Into his Ear, Causes Hearing Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.