Fake Vs Real: व्हायरल फोटोत दिसणारा खड्डा वाटेल फोटोशॉपची कमाल पण सत्य समजताच उडेल डोळ्यांवरचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:55 IST2022-06-07T18:38:17+5:302022-06-07T18:55:52+5:30
निसर्गाच्या चमत्कारांचे फोटो व्हायरल होतात तेव्हा ते अनेकदा आपल्याला फेक वाटतात. फोटोशॉप केलेले किंवा ग्राफिक्सच्या किमयेने तयार केलेले हे फोटो आहेत असे पाहणाऱ्यांना वाटते. पण हे चुकीचे ठरवणारा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

Fake Vs Real: व्हायरल फोटोत दिसणारा खड्डा वाटेल फोटोशॉपची कमाल पण सत्य समजताच उडेल डोळ्यांवरचा विश्वास
प्रकृतीचे चमत्कार जितके विलोभनीय असतात तितकेच काहीवेळा भयानकही असतात. या चमत्कारांकडे पाहुन आपण चकित होतो. असं कसं शक्य आहे असे प्रश्न आपल्याला पडतात. ज्यावेळी अशा निसर्गाच्या चमत्कारांचे फोटो व्हायरल होतात तेव्हा ते अनेकदा आपल्याला फेक वाटतात. फोटोशॉप केलेले किंवा ग्राफिक्सच्या किमयेने तयार केलेले हे फोटो आहेत असे पाहणाऱ्यांना वाटते. पण हे चुकीचे ठरवणारा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
या फोटोत तुम्हाला एक अत्यंत खोल खड्डा दिसेल. अर्थात हा मानवनिर्मित खड्डा नसुन निसर्गनिर्मित आहे. हा खड्डा १०० फुट खोल आणि ६५ फूट रुंद आहे. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला येथे हा खड्डा तयार झाला आहे. येथे एक वादळ आले होते त्या वादळात या ठिकाणाची जमीन खचली आणि हा विशाल खड्डा तयार झाला.
येथील स्थानिक लोक म्हणतात की जेव्हा ही जमिन खचली तेव्हा अनेक घरे, विजेचे खांब भुमीत गेले. त्यासोबतच अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले. असे खड्डे चुनखडी असलेल्या प्रदेशात जास्त तयार होतात. अशा खड्ड्यांमुळे तेथील लोकांना येथे रहावे की हा भाग सोडून जावा असा संभ्रम निर्माण झाला आहे.
A dramatic sinkhole collapse from 2010 in Guatemala City 300 feet (100 meters) deep. http://t.co/8eIKGmTL38pic.twitter.com/pBFwdFrh7j
— USGS (@USGS) September 30, 2014