VIDEO : गपचूप तिसरं लग्न करत होता पती, पहिल्या पत्नी येऊन केला त्याचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 09:53 IST2023-03-27T09:49:14+5:302023-03-27T09:53:23+5:30

नवरदेव आपला पती असल्याचं सांगत तिने तिथे गोंधळ घातला. पती मला तीन दिवस हैदराबादला जातो असं सांगून गेला आणि आता दुसरं लग्न करत आहे, असं ती म्हणाली.

Groom secretly getting married for the third time first wife revealed in wedding | VIDEO : गपचूप तिसरं लग्न करत होता पती, पहिल्या पत्नी येऊन केला त्याचा भांडाफोड

VIDEO : गपचूप तिसरं लग्न करत होता पती, पहिल्या पत्नी येऊन केला त्याचा भांडाफोड

पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसऱ्या महिलेसोबत लग्न केल्या जाण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशात त्यांच्या लग्नातील हाय-व्होल्टेज ड्रामा झाल्याच्याही घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला तिच्या मुलासोबत पतीच्या तिसऱ्या लग्नात पोहोचली. नवरदेव आपला पती असल्याचं सांगत तिने तिथे गोंधळ घातला. पती मला तीन दिवस हैदराबादला जातो असं सांगून गेला आणि आता तिसरं लग्न करत आहे, असं ती म्हणाली.

व्हिडिओत बघू शकता की, महिला अचानक पतीच्या दुसऱ्या लग्नात पोहोचली आणि सगळ्यांसमोर तिने त्याचा भांडाफोड केला. नंतर एका रूममध्ये जातात. महिलेला लग्नात पाहून पाहुणेही हैराण झाले. महिलेने सांगितलं की, 10 ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.

इतकंच नाही तर महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने दुसरं लग्न केलं होतं आणि दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीने पतीच्या तिसऱ्या लग्नाची माहिती दिली होती. पण तिची तब्येत बरी नसल्याने ती आली नाही. महिला म्हणाली की, आता आमच्या लग्नाच्या 4 वर्षानंतर तो पुन्हा लग्न करत आहे. महिलेने आपल्या पतीच्या परिवारावरही आरोप लावले. यावेळी नवरदेवाला मारहाण केल्याचंही दिसलं.

या घटनेचा एका व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त रिट्विट आणि 73 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर कमेंट्सही करत आहेत.
 

Web Title: Groom secretly getting married for the third time first wife revealed in wedding