लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 09:36 AM2023-05-30T09:36:21+5:302023-05-30T09:36:44+5:30

Marriage Weird News : लग्नानंतर नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. पण अचानक रस्त्यातून तो नवरीच्या घरी परत आला. त्यानंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का.

Groom returned to his in laws house after marriage with bride demand gold ring diamond and chain, Marriage cancled in Azamgarh UP | लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का...

लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का...

googlenewsNext

Marriage Weird News : सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात लग्नात घडणाऱ्या अनेक अजब घटना रोज समोर येतात. ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आजमगढमधून लग्नाबाबत एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. पण अचानक रस्त्यातून तो नवरीच्या घरी परत आला. त्यानंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का.

नवरदेवाला लग्नात सोन्याची अंगठी आणि चेन मिळाली नाही म्हणून तो नाराज होता. सासरी परत गेल्यावर त्याचा सासरच्या लोकांसोबत वाद झाला. इतकंच नाही तर हे लग्न मोडण्याच्या बदल्यात नवरीकडील लोकांनी लग्नाचा पूर्ण खर्च मागितला. यानंतर नवरीकडील लोकांनी गिफ्ट म्हणून दिेलेल्या सर्व वस्तू ठेवून घेतल्या आणि नवरदेव व त्याच्या वडिलाला बंधक बनवलं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी सुरू केली. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. 

असं सांगण्यात आलं की, तुरकवली गावातून वरात आली होती. वरात साधारण 9 वाजता आलमपूर इथे पोहोचली आणि मोठ्या जल्लोषात वरातीचं स्वागत करण्यात आलं. रात्री उशीरा सगळे रितीरिवाज पार पडले. पण सोन्याची अंगठी आणि चेन न मिळाल्याने मुलगा नाराज होता. शेवटच्या एका रिवाजासाठी तो नवरीच्या घरात गेला नाही. तो गाडीमध्येच बसून होता. अशात नवरी त्याच्यासोबत बसून सासरी निघाली.

अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर अंगठी आणि चेन न मिळाल्याने तो चिडचिड करत होता. सासरच्या लोकांना फोन करून त्याने सांगितलं की, तो नवरीसोबत सासरी परत येत आहे. त्यानंतर तिथे पोहोचून तो अंगठी आणि चेनची डिमांड करू लागला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये वाद झाला. अशात नवरीनेही सासरी जाण्यास नकार दिला.

दरम्यान वाद इतका वाढला की, नवरीकडील लोकांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलाला बंदी बनवलं. अशात मुलीकडील लोकांनी हे नातं तोडण्यासाठी लग्नात खर्च झालेल्या 6 लाख रूपयांची डिमांड केली. पण या घटनेची सूचना पोलिसांना मिळाली आणि त्यांनी दोन्हीकडील लोकांना पोलीस स्टेशनला नेलं.

पंचायत झाल्यानंतर देवाण-घेवाण करण्यात आलेल्या वस्तू परत घेतल्या गेल्या. यात ठरल्यानुसार लग्नात खर्च झालेले 1 लाख 95 हजार रूपये नवरीकडील लोकांना परत केले. यानंतर हे लग्न मोडण्यात आलं. 

Web Title: Groom returned to his in laws house after marriage with bride demand gold ring diamond and chain, Marriage cancled in Azamgarh UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.