सुट्टी न मिळण्याचं कारण सांगत दुसरं लग्न करून राहत होता प्रोफेसर, पत्नी अन् मेहुणीने केली धुलाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:57 IST2024-03-07T12:55:01+5:302024-03-07T12:57:06+5:30

त्याच्या पहिल्या पत्नीला जेव्हा संशय आला जेव्हा ती पतीच्या नव्या घरात पोहोचली. जेव्हा तिने त्याला दुसऱ्या महिलेसोबत बघितलं तेव्हा बहिणीसोबत मिळून त्याची चांगली धुलाई केली. 

Greater Noida wife and sister in law beaten private university professor after seeing with him other woman | सुट्टी न मिळण्याचं कारण सांगत दुसरं लग्न करून राहत होता प्रोफेसर, पत्नी अन् मेहुणीने केली धुलाई!

सुट्टी न मिळण्याचं कारण सांगत दुसरं लग्न करून राहत होता प्रोफेसर, पत्नी अन् मेहुणीने केली धुलाई!

अनैतिक संबंधांच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. ज्या हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक घटना ग्रेटर नोएडामधून समोर आली आहे. येथील एका प्रायव्हेट यूनिवर्सिटीमध्ये प्रोफेसरने दुसरं लग्न केलं आणि तो आधीच्या पत्नीपासून लपून राहत होता. तो गेल्या एक वर्षापासून सुट्टी न मिळण्याचं कारण सांगत तो घरी जात नव्हता. त्याच्या पहिल्या पत्नीला जेव्हा संशय आला जेव्हा ती पतीच्या नव्या घरात पोहोचली. जेव्हा तिने त्याला दुसऱ्या महिलेसोबत बघितलं तेव्हा बहिणीसोबत मिळून त्याची चांगली धुलाई केली. 

बुलंदशहर जिल्ह्यात राहणारा एक व्यक्ती दनकौर भागाताली एका यूनिवर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करतो. 2020 मध्ये त्याचं ख्रुर्जामध्ये राहणाऱ्या एका तरूणीसोबत लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगाही झाला. पीडित पत्नीने सांगितलं की, गेल्या एक वर्षापासून तो त्याच्या घरी जात नव्हता. जेव्हा त्याला याबाबत पत्नीने विचारलं तर त्याने सुट्टी मिळत नसल्याचं कारण सांगितलं. 

यानंतर पत्नीला त्याच्यावर संशय आला तेव्हा तिने काही लोकांना सोबत घेऊन त्याचा शोध घेणं सुरू केलं. पण तो नेहमीच आपली राहण्याची जागा बदलत होता. गेल्या बुधवारी त्याची पत्नी, तिची बहीण आणि काही नातेवाईक त्याच्या घरी पोहोचले. तिथे तो एका दुसऱ्या महिलेसोबत दिसला. बराचवेळ गोंधळ सुरू होता. त्यानंतर महिलेने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

जेव्हा व्यक्तीच्या पत्नी आणि मेहुणीने त्याला दुसऱ्या महिलेसोबत बघितलं तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली. त्यानेही दोघींसोबत मारहाण केली. आरोप हा आहे की, तो आता त्याच्या पत्नीला सोबत ठेवण्यास नकार देत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Web Title: Greater Noida wife and sister in law beaten private university professor after seeing with him other woman