ज्याने १४ वर्षाआधी वाचवलं, गोरिल्लाने त्याच्याच कुशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयद्रावक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:43 PM2021-10-07T14:43:53+5:302021-10-07T14:49:38+5:30

Social Viral : दाकासी नावाच्या गोरिल्लाचं वय १४ वर्षे होतं. नॅशनल पार्ककडून ही दु:खद माहिती देण्यात आली. दाकासी अनाथ होती आणि पार्कच्या सेंस्वेक्वे सेंटरमध्ये राहत होती.

Gorilla from viral selfie dies in arms of caretaker who rescued her | ज्याने १४ वर्षाआधी वाचवलं, गोरिल्लाने त्याच्याच कुशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयद्रावक फोटो

ज्याने १४ वर्षाआधी वाचवलं, गोरिल्लाने त्याच्याच कुशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयद्रावक फोटो

Next

२०१९ मध्ये एक मादा गोरिल्ला फारच फेमस झाली होती. कारण तिचा तिच्या केअरटेकरसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. लोकांना गोरिल्लाचा हा फोटो फारच आवडला होता. दुर्दैवाने एक महिन्याच्या आजारानंतर या गोरिल्लाने आपल्या केअरटेकरच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. ही मादा गोरिल्ला १० वर्षापासून कॉन्गोच्या विरूंगा नॅशनल पार्कमध्ये राहत होती.

दाकासी नावाच्या गोरिल्लाचं वय १४ वर्षे होतं. नॅशनल पार्ककडून ही दु:खद माहिती देण्यात आली. दाकासी अनाथ होती आणि पार्कच्या सेंस्वेक्वे सेंटरमध्ये राहत होती. तिने केअरटेकरचा मित्र बनलेल्या आंद्रे बॉमाच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. दाकासी दोन महिन्यांची असताना तिला २००७ मध्ये विरूंगा रेंजर्सने आपल्या मृत आईला बिलगलेलं पाहिलं होतं. तिला नंतर गोमामध्ये रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलं. जिथे ती बॉमाला भेटली. त्यानंतर १० वर्ष बॉमा तिचा केअरटेकर होता.

पार्कने सांगितलं की, रात्रभर बॉमा गोरिल्लाच्या पिल्लाला चिकटून बसला होता जेणेकरून पिल्ल्याला उष्णता आणि आराम मिळेल. दाकासीला पुन्हा जंगलात सोडण्याऐवजी पार्कमध्ये आणण्यात आलं. इथे अनाथ पहाडी गोरिल्ला राहत होते. हे अशाप्रकारचं जगातलं एकुलतं एक सेंटर आहे. 

ही गोरिल्ला मादा सर्वात जास्त फेमस तेव्हा  झाली जेव्हा बॉमा आणि एका दुसऱ्या गोरिल्लासोबत तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो जगभरातील लोकांनी शेअर केला होता. बॉमा म्हणाला की, तो स्वत:ला नशीबवान समजतो की, त्याला दाकासीची काळजी घेण्याची संधी मिळाली. तो म्हणाला की, दाकासीसोबतच्या मैत्रीमुळे त्याला मनुष्य आणि ग्रेट एप्स यांच्यातील मैत्री समजून आली.

तो म्हणाला की, 'मी तिच्यावर मुलासारखं प्रेम करत होतो आणि तिच्या वागण्याने माझ्या चेहऱ्यावर हसू येत होतं. आम्हाला तिची खूप आठवण येईल. मात्र, आम्ही आभारी आहोत की, दाकासी आमच्या जीवनात इतका आनंद घेऊन आली.

Web Title: Gorilla from viral selfie dies in arms of caretaker who rescued her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.