ठुकरा के मेरा प्यार...वजनामुळे गर्लफ्रेंड सोडून गेली, पठ्ठ्याने एका वर्षात 70 किलो वजन कमी केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 16:41 IST2022-08-23T16:40:00+5:302022-08-23T16:41:13+5:30
वाढत्या वजनामुळे गर्लफ्रेंडने ब्रेकअप केले, हार न मानता तरुणाने स्वतःच्या फिटनेसवर काम केले.

ठुकरा के मेरा प्यार...वजनामुळे गर्लफ्रेंड सोडून गेली, पठ्ठ्याने एका वर्षात 70 किलो वजन कमी केले
बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेकजण त्यांच्या हाताच्या नसा कापतात किंवा स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करतात. पण, एका तरुणाने ब्रेकअपनंतर स्वतःमध्ये असा काही बदल केला, ज्यामुळे तो रातोरा सोशल मीडियावर फेमस झाला. आम्ही इथे सोशल मीडिया स्टार पुवीबद्दल बोलत आहोत. पुवीच्या गर्लफ्रेंडने त्याचे वजन जास्त असल्याने ब्रेकअप केले.
पुवी अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो
गर्लफ्रेंड सोडून गेल्यामुळे हताश न होता, पुवीने स्वतःवर काम करायला सुरुवात केली. त्याने हार न मानता आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आणि त्याचा परिणाम एका वर्षात त्याला दिसायला लागला. 139 किलो वजनी पुवीने एका वर्षात 70 किलो वजन कमी केले. या बदलामुळे त्याच्यात एक अद्भुत परिवर्तन तर झालेच, पण तो सोशल मीडिया स्टार बनला. आज पुवी अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे.