Girlfriend glue cheating evidence of boyfriend on his room | बोंबला! आणखी तीन तरूणींसोबत सुरू होतं अफेअर, गर्लफ्रेन्डला समजलं तर तिने असा शिकवला धडा!

बोंबला! आणखी तीन तरूणींसोबत सुरू होतं अफेअर, गर्लफ्रेन्डला समजलं तर तिने असा शिकवला धडा!

प्रेमात दगा दिल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. अनेकदा तर हे सगळं इतकं वाढतं की, लोकांची नाती नेहमीसाठी तुटतात. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीला समजलं की, तिचा बॉयफ्रेन्ड ३ तरूणींची फसवणूक करतोय. तर तिने त्याला धडा शिकवण्यासाठी असं काही केलं की स्वत: हैराण आहे. 

Emely Zambrano ने याचा एक व्हिडीओ रिलीज केला आहे. यात तिने तिच्या बॉयफ्रेन्ड विरोधात सर्व पुरावे एकत्र केले आणि ते त्याच्या बेडरूममध्ये चिटकवले. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, तिने सांगितले की, 'मी माझ्या बॉयफ्रेन्डला जेव्हाही म्हणायचे की, तू मला दगा देतोय. चीट करतोय. तर तो मला मी वेडी आहे असं म्हणायचा. मग मी ठरवलं की मी त्याच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करेन आणि त्याच्या प्रिंट काढेन'. (हे पण वाचा : बोंबला! जबरदस्ती किस करत महिलेने दाताने तोडली त्याची जीभ, ती पक्षी घेऊन गेला अन् खाऊन टाकली.....)

मग एम्लीने सर्व पुरावे गोळा केले. त्यातून तरूणींचे फोटो ब्लर केले. त्यांची नावे ब्लर केली आणि ते पुरावे भींतीवर चिटकवले. हे करण्यासाठी तिला दोन तास लागले. तिने हेही सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेन्डने याआधीही अनेकदा तिला दगा दिला. पण तेव्हा तिच्याकडे पुरावे नव्हते. (हे पण वाचा : जुळे भाऊ ऑपरेशन करून बनल्या बहिणी, आजोबांनी प्रॉपर्टी विकून सर्जरीसाठी दिले पैसे!)

हे सगळं केल्यावर तिने तिच्या बॉयफ्रेन्डला मेसेज केला. तिने मेसेज केला की, 'तुझ्यासाठी सरप्राइज आहे'. यानंतर तिने त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेन्डने तिला खूप मेसेज केले, व्हाइस मेसेज केले. पण आता यावेळी एम्लीने त्याच्यासोबत कोणतंही नातं न ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
 

Web Title: Girlfriend glue cheating evidence of boyfriend on his room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.