गर्लफ्रेंडचं कौतुक केलं तरी झालं ब्रेकअप, वाचा असं तो काय म्हणाला की झाले वेगळे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 02:17 PM2024-04-06T14:17:46+5:302024-04-06T14:18:09+5:30

तिने त्याला विचारलं की, मी कशी दिसत आहे? यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून ती संतापली आणि त्याच्यासोबत भांडू लागली.

Girlfriend broke up with boyfriend, reason will shock you | गर्लफ्रेंडचं कौतुक केलं तरी झालं ब्रेकअप, वाचा असं तो काय म्हणाला की झाले वेगळे!

गर्लफ्रेंडचं कौतुक केलं तरी झालं ब्रेकअप, वाचा असं तो काय म्हणाला की झाले वेगळे!

तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे तुम्ही कितीही चांगलं बोला त्याचा चुकीची अर्थ काढतात आणि यामुळे तुमच्यात वाद होतो. नुकतंच एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. तो त्याच्या गर्लफ्रेंडचं कौतुक करण्यासाठी असं काही बोलला की, त्यांचं थेट ब्रेकअप झालं.

या व्यक्तीने हा किस्सा रेडिटवर सांगितला. तो म्हणाला की, तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका इव्हेंटमध्ये जाण्यासाठी तयार होत होता. त्याच्या गर्लफ्रेंडने मॅचिंग हॅंडबॅंडसोबत पोल्का डॉट ड्रेस घातला होता. सोबतच तिने डोक्यावर एक बो लावला होता. तिने त्याला विचारलं की, मी कशी दिसत आहे? यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून ती संतापली आणि त्याच्यासोबत भांडू लागली.

'तू मला उंदीर म्हणालास?'

व्यक्तीने सांगितलं की, 'मी तिला म्हणालो होतो की, तू फार क्यूट दिसत आहेस. एखाद्या मिनी माउससारखी. माझा अर्थ होता की, ती मिनी माउससारखी क्यूट दिसत आहे. पण ती रागावली आणि म्हणाली की, मी तुला उंदीर दिसत आहे का? मी काय गटारात राहते?'. मी हे ऐकून जरा हैराण झालो. पण मला नंतर वाटलं की, ती गंमत करत असेल. 

त्यालाच म्हणाली उंदीर...

मी तिला खूप समजावलं, पण तिने काही समजून घेतलं नाही. ती फार भडकली होती. ती रागावून मला खूप काही बोलली. ती म्हणाली की, तू उंदीर आहेस, तू गटारात राहतोस. मी माझ्या कारची चावी घेऊन तिथे शांत उभा होतो. ती रागाने तिथून निघून गेली. मला समजलंच नाही की, मी असं काय केलं? मी दुसऱ्या दिवशी तिला फोन केला तर तिने मला ब्लॉक केलं होतं. एवढ्याशा गोष्टीवरून आम्ही वेगळे झालो.

Web Title: Girlfriend broke up with boyfriend, reason will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.