टाइट ड्रेस घालून तरूणीची झाली ही अवस्था, कपडे काढण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घेऊन आला बॉयफ्रेन्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:15 PM2021-09-24T16:15:54+5:302021-09-24T16:23:00+5:30

ही तरूणी तिच्यासाठी एक नवीन ड्रेस घेऊन आली होती. पण तिला जराही अंदाज नव्हता की, हा ड्रेस ट्राय करण्याच्या नादात काहीतरी विचित्र घडेल. 

Girl stuck in her tight dress while home alone video viral on social media girl try new dress | टाइट ड्रेस घालून तरूणीची झाली ही अवस्था, कपडे काढण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घेऊन आला बॉयफ्रेन्ड

टाइट ड्रेस घालून तरूणीची झाली ही अवस्था, कपडे काढण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घेऊन आला बॉयफ्रेन्ड

Next

अनेकदा व्यक्ती अशा स्थितीत अडकतो, ज्याबाबत जाणून घेतल्यावर हसू कोसळतं. मोठ्या समस्या तर लोकांना हैराण तर करतातच, पण अनेकदा छोट्या छोट्या  समस्याही लोकांना  हैराण करण्यासाठी पुरेशा असतात. अशाच एका स्थितीत अडकल्याने एक तरूणी सोशल मीडिया फेमस झाली आहे. ही तरूणी तिच्यासाठी एक नवीन ड्रेस घेऊन आली होती. पण तिला जराही अंदाज नव्हता की, हा ड्रेस ट्राय करण्याच्या नादात काहीतरी विचित्र घडेल. 

लंडनमध्ये राहणाऱ्या एका तरूणीने टिकटॉकवर @slurricanemandy नावाने अकाउंट बनवलं. तिने तिच्यासाठी एक ड्रेस घेतला होता. जेव्हा ती हे कपडे ट्राय करत होती, तेव्हा तिच्या घरात कुणीच नव्हतं. तिने जेव्हा तो ड्रेस घातला तो फारच टाइट झाला. पण तिला अंदाज नव्हता की पुढे काय होणार आहे. ड्रेस काढताना तरूणी कपड्यांमद्ये अडकली. ती प्रयत्न करूनही कपडे काढू शकत नव्हती. अडचण इतकी वाढली की, तिला व्हिडीओ कॉल करून ऑफिसमधून बॉयफ्रेन्डला बोलवावं लागलं.

तरूणीने त्यानंतर आपल्या स्थितीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. क्लिपमध्ये तिने सांगितलं की, ती ड्रेसमध्ये अशी काही अडकली की, त्यातून निघूच शकत नव्हती. आता तिचा प्रियकर ऑफिसमधून येऊन तिला काढेल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरूणी आपला ड्रेस खेचून काढताना दिसली. पण तिला ते जमलं नाही. प्रियकर येईपर्यंत ती घरातील बाथरूममध्ये बसून होती. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या. एका व्यक्तीने लिहिलं की, समस्या कधीही येऊ शकतात. तेच एका महिलेने कमेंट केली की, ड्रेस घे पण असा नको घेऊ. लोकांना हा व्हिडीओ फारच मजेदार वाटत आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची झिपही नव्हती. तरूणी म्हणाली की, तिच्या शरीरातून ड्रेस निघत नव्हता तेव्हा तिला तिचा आयुष्याचा फ्लॅशबॅक दिसला. कपडे काढण्याच्या प्रयत्नात ती बाथटबमध्ये पडली.
 

Web Title: Girl stuck in her tight dress while home alone video viral on social media girl try new dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app