बोंबला! बॉयफ्रेन्डने दिला दगा तर तरूणीने शिकवला धडा, त्याच्या वडिलासोबत केलं लग्न आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 15:22 IST2022-07-26T15:22:17+5:302022-07-26T15:22:57+5:30

Weird Lovestory : तरूणी एका तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण मग तिला असं काही समजलं की, तिचं मन दुखलं. तरूणाने तरूणीला दगा दिला, एकदा नाही तर दोनदा.

Girl married to father of her ex boyfriend as he ditched her | बोंबला! बॉयफ्रेन्डने दिला दगा तर तरूणीने शिकवला धडा, त्याच्या वडिलासोबत केलं लग्न आणि मग...

बोंबला! बॉयफ्रेन्डने दिला दगा तर तरूणीने शिकवला धडा, त्याच्या वडिलासोबत केलं लग्न आणि मग...

Weird Lovestory : तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या लव्हस्टोरीज ऐकल्या असतील. पण एक अशीही लव्हस्टोरी आहे ज्याबाबत वाचून तुमचं डोकं चक्रावून जाईल. सोशल मीडियावर एका तरूणीने तिची लव्हस्टोरी सांगून सगळ्यांना हैराण केलंय. असं सांगितलं जात आहे की, तरूणी एका तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण मग तिला असं काही समजलं की, तिचं मन दुखलं. तरूणाने तरूणीला दगा दिला, एकदा नाही तर दोनदा. तरूणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या तरूणीचं नाव ऑगस्ट हबल आहे आणि ती अमेरिकेची राहणारी आहे. जेव्हा ती  21 वर्षांची होती तेव्हा एका 30 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. त्यांचं नातं सुरू झालं तेव्हा सगळं काही ठीक सुरू होतं. तरूणीनुसार, बॉयफ्रेन्ड तिच्यासाठी फुलं आणत होता, गिफ्ट देत होता आणि लग्नाबाबत विचारतही होता.

एका व्हिडीओत तरूणीने सांगितलं की, या दोघांचं नातं 2 वर्ष चाललं. पण नंतर तरूणीला समजलं की, तरूण तिला दगा देत आहे. तिचा बॉयफ्रेन्ड तिच्या मैत्रीला भेटत होता. हे नंतर त्याने कबूलही केलं होतं. तरीही तरूणीने त्याला दुसरी संधी दिली. पण तरूण पुन्हा रंगेहाथ पकडला गेला.

दोनदा फसवल्यानंतर तरूणीने तिच्या बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप केलं. यानंतर तरूणीला बॉयफ्रेन्डचा वडील आवडला आणि तिने त्याच्यासोबत लग्न केलं. एका टिकटॉक व्हिडीओत हबलने सांगितलं की, तिने तिच्या एक्सच्या वडिलासोबत तिची पाचवी अॅनिव्हर्सरी साजरी केली. आता तरूणी तिच्या पतीसोबत आनंदी आहे.

Web Title: Girl married to father of her ex boyfriend as he ditched her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.