बाबो! या तरुणीने तर कळसंच केला, नवऱ्याशिवाय केलं लग्न, पाहुण्यांना बोलवलं अन् घातली हिऱ्यांची अंगठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 18:10 IST2021-08-27T18:09:36+5:302021-08-27T18:10:16+5:30

म्हणजे दोन जीवांचे बंधन असं म्हटलं जातं. मग अशावेळी कोणी स्वत:वर प्रेम आहे म्हणून स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला तर?

girl got married to herself unique wedding sologamy self commitment wedding | बाबो! या तरुणीने तर कळसंच केला, नवऱ्याशिवाय केलं लग्न, पाहुण्यांना बोलवलं अन् घातली हिऱ्यांची अंगठी

बाबो! या तरुणीने तर कळसंच केला, नवऱ्याशिवाय केलं लग्न, पाहुण्यांना बोलवलं अन् घातली हिऱ्यांची अंगठी

आपल्या समाजात अनेक अशा रुढी, परंपरा आहेत ज्याला सध्याची लेटेस्ट जनरेशन मान्य करत नाही. आजच्या तरुणाईला बंधनांनमध्ये राहणं आवडतं नाही. जसं आपण इतरांवर प्रेम करतो तसं स्वत:वरही प्रेम केलं पाहिजे असंच आजच्या तरुणाईला वाटतं.  पण लग्न म्हणजे दोन जीवांचे बंधन असं म्हटलं जातं. मग अशावेळी कोणी स्वत:वर प्रेम आहे म्हणून स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला तर?

ऑस्ट्रेलियातील तरुणीनं हेच केलंय. पॅट्रीसिया क्रिस्टीन नामक या तरुणींन नवऱ्याशिवाय स्वत:चं लग्न केलं. म्हणजेच तिनं स्वत:च लग्न स्वत:शी लावून दिलं. तिच्या मते हे सेल्फ कमिंटमेंट आहे. तिचं हे पाऊल नेटवर चर्चेचा विषय ठरलंय.

पॅट्रीसिया हिचा ठरलेला साखरपुडा मोडला. त्यानंतर तिने ठरवलं की जसं इतरांवरती प्रेम करणं गरजेचं आहे तसंच स्वत:वरतीही केलं पाहिजे. त्यातूनच तिनं ठरवलं की स्वत:चंच स्वत:शी लग्न करायचं. मग तिने स्वत:साठी वेडिंग गाऊन शिवला. हिऱ्याची अंगठी घेतली, पूर्ण पार्टीचं प्लानिंग केलं आणि पत्रिकाही छापल्या. तिच्या मित्रांना पत्रिका वाटल्यावर ते तिच्या लग्नासाठी आले खरे पण ते नवरा शोधु लागले.

पॅट्रीसियाने तेव्हा सर्वांना सांगितलं की ती स्वत:शी लग्न करत असून तिने आयुष्यभर स्वत:वर प्रेम करण्याचा आणि स्वत:ला कायम खुश ठेवण्याचं वचन दिलंय,

Web Title: girl got married to herself unique wedding sologamy self commitment wedding