Giraffe bend to eat grass has left millions of people laughing hilarious viral video | बाबो! जिराफानं गवत खाण्यासाठी केला भन्नाट जुगाड, ९० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला व्हिडीओ

बाबो! जिराफानं गवत खाण्यासाठी केला भन्नाट जुगाड, ९० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला व्हिडीओ

जिराफाची मान किती मोठी असते याची कल्पना सगळ्यांनाच आहे. जिराफाची मान झाडाच्या मोठमोठ्या फाद्यांपर्यंत  पोहोचू शकते. यावरून तुम्हाला कळलं असेल की जिराफ झाडांचा पाला कसा खातो. पण जिराफाने जर गवत खायचं म्हटलं ते खूप कठीण आहे. कारण इतकी मोठी मान कशी गवतापर्यंत पोहोचणार?. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गवत खाण्यासाठी जिराफ कशाप्रकारे स्टंट करत आहे. 

हा व्हिडीओ पाहून अनेकजण लोटपोट होऊन हसले आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर युजर '@ डॅनीडचद्वारे शेअर करण्यात आला आहे. मायक्रोब्लोगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन दिलं आहे की,  जिराफ असं गवत खाऊ शकतो असा मी विचारही केला नव्हता. गवतापर्यंत पोहोचण्यासाठी जिराफ आपल्या दोन्ही पायांना ताण देत लांब करून मान खाली पुरवत आहे. गवत खाऊन झाल्यानंतर पुन्हा नीट उभा राहत आहे. त्यानंतर परत तशीच क्रिया करत आहे. हसून हसून पोट दुखायला लावणारा हा व्हिडीओ आहे. बोंबला! सुंदर दिसण्यासाठी केला जुगाड पण महिलेचा चेहरा बिघडला, वेदनादायी ट्रिटमेंटसाठी घालवले लाखों रूपये

एखादा व्यायाम करत असल्याप्रमाणे जिराफाची स्थिती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर १२ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडिओला ९.७ मिलियन व्हिव्हज मिळाले आहेत. २ लाखांपेक्षा जास्त लोकांना या व्हिडीलो लाईक केलं आहे.  अनेकांनी या व्हिडीओवर  कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रोजचं जीवन जगत असताना जिराफ कसं काम करत असेल, जेवणं, पाणी पिणं याबाबत कमेंट्समध्ये फोटो पोस्ट केली आहे.  बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ

Web Title: Giraffe bend to eat grass has left millions of people laughing hilarious viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.