हेलिकॉप्टरमधून उतरला, गुडघ्यावर बसला, गर्लफ्रेन्डसमोर ठेवल्या ५ डायमंड रिंग, व्हिडीओचा धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:33 IST2021-04-14T16:27:08+5:302021-04-14T16:33:32+5:30
एका तरूणाने फारच रॉयल आणि अनोख्या अंदाजात लग्नासाठी प्रपोजल केलं. जॉर्जियाच्या अटलांटामध्ये विलियम हनने आपल्या गर्लफ्रेन्डला ४ एप्रिलला प्रपोज केलं होतं.

हेलिकॉप्टरमधून उतरला, गुडघ्यावर बसला, गर्लफ्रेन्डसमोर ठेवल्या ५ डायमंड रिंग, व्हिडीओचा धुमाकूळ!
आपल्या गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी बॉयफ्रेन्ड्स अनोख्या आणि यूनिक आयडिया लावत असतात. अनेक प्रपोज हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक प्रपोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डला लग्नासाठी गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
एका व्यक्तीने फारच रॉयल आणि अनोख्या अंदाजात लग्नासाठी प्रपोजल केलं. जॉर्जियाच्या अटलांटामध्ये विलियम हनने आपल्या गर्लफ्रेन्डला ४ एप्रिलला प्रपोज केलं होतं. विलियम हन हेलीकॉप्टरने एका बिल्डींगच्या छतावर सूट-बुटात उरतला आणि आपली गर्लफ्रेन्ड ब्रिटनी निशेल मिलरला प्रपोज केलं. (हे पण वाचा : बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....)
५ डायमंड रिंग
प्रपोज करताना विलियम काही शब्दही बोलला ज्याने ब्रिटनी फार भावूक झाला आणि रडू लागली. विलियमने प्रपोजलनंतर ब्रिटनीसमोर पाच डायमंडच्या रिंग धरल्या आणि त्यातील एक निवडण्यास सांगितले. हा पूर्ण व्हिडीओ ब्रिटनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (हे पण वाचा : एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!)
काय म्हणाला बॉयफ्रेन्ड?
विलियम यावेळी म्हणाला की, 'जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात आली नव्हती तोपर्यंत मला वाटत होतं की, मला माहीत आहे प्रेम काय असतं. तू मला याची जाणीव करून दिली की, तू माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि आता मलाही याची जाणीव झाली आहे की, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. ब्रिटनी निशेल मिलर काय तू माझ्याशी लग्न करशील?