...म्हणून 'त्यांनी' फुटबॉलच्या स्टेडियममध्ये तयार केलं जंगल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 13:11 IST2019-09-12T13:06:53+5:302019-09-12T13:11:12+5:30
हे जंगल डायस्टोपियन कलेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. हे एक आर्ट इन्स्टॉलेशन असून याने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे.

...म्हणून 'त्यांनी' फुटबॉलच्या स्टेडियममध्ये तयार केलं जंगल!
जंगल कुठेही तयार केलं जाऊ शकतं हे समजावून सांगण्यासाटी स्विस आर्टिस्ट क्लाउस लिटमॅनने ऑस्ट्रियाच्या फुटबॉल स्टेडियममध्ये जंगल तयार केलं. लोकांमध्ये झाडांप्रति जागरूकता करण्यासाठी आणि ग्लोबल वार्मिंगमुळे होणाऱ्या समस्यांना दाखवण्यासाठी हे जंगल तयार करण्यात आलं. या जंगलात ३०० झाडे आहेत. क्लॅगनफर्ट शहरातील वॉर्गेसी स्टेडियमला लवकर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं केलं जाणार आहे.
हायस्टोपियन कलेने प्रेरित आहे हे जंगल
हे जंगल डायस्टोपियन कलेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. हे एक आर्ट इन्स्टॉलेशन असून याने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. लिटमॅनने ऑस्ट्रेलियाचे कलाकार आणि आर्किटेक्ट मॅक्स पिंटनरच्या मदतीने हे पूर्ण केलं. त्यांनी ३० वर्ष जुन्या डायस्टोपियन कलेपासून प्रेरित होऊन झाडे एका रेषेत लावून एक जंगल तयार केलं. त्यात वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावण्यात आलीत.
सार्वजिनक ठिकाणांवर शिफ्ट करणार जंगल
स्टेडियम ऑस्ट्रिया फुटबॉल सेकेंड लीग टीम ऑस्ट्रिया क्लागेनफर्टचं होम ग्राउंड आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अस्थायी कलेचा नमूना दुसरीकडे हटवेपर्यंत टीम करावनकेनब्लिक स्टेडियममध्ये खेळणार. दुसऱ्या शहरांचे लोकही प्रेरित व्हावे यासाठी ऑक्टोबरमध्ये हे जंगल दुसऱ्या ठिकाणांवर शिफ्ट केलं जाणार आहे.
निर्सगाला आव्हान द्यायचं होतं
लिटमॅन यांनी सांगितले की, जंगल तयार करण्याचा उद्देश निसर्गाला आव्हान देणं हा होता. त्यांचं मत आहे की, गरजेचं नाही की, जी वस्तू नेहमी जिथे असते, तिथेच ती असावी. दरम्यान या कामावेळी त्यांना समजून आलं की, भविष्यात निसर्ग केवळ काही विशेष जागांवरच आढळेल. याआधीही लिटॅन यांनी त्यांच्या जबरदस्त कलाकृतीतून लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.