सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:17 IST2021-08-27T15:16:56+5:302021-08-27T15:17:30+5:30
बदायूमधील दबथरा गावातील ही घटना आहे. सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरातून पळून गेले.

सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि...
प्रेमाच्या आणि लग्नाच्या विचित्र घटना दररोज देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून समोर येत असतात. यातील काही घटना इतक्या विचित्र असतात की, वाचून लोक हैराण होतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बदायूंमधून समोर आली आहे. इथे एक सासरा आपल्या सूनेच्या म्हणजे मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडला. इतकंच नाही तर ते दोघे पळून गेले आणि लग्न करून एका बाळासोबत घरी परतले.
इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या एका वृत्तानुसार, बदायूमधील दबथरा गावातील ही घटना आहे. सासरा आणि सून एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरातून पळून गेले. त्यांनी लग्न केलं आणि काही वर्षांनी दोन वर्षांचं बाळ घेऊन घरी परतले. पण तोपर्यंत हे प्रकरण निवळलं नव्हतं. महिलेच्या पतीनं पत्नी आणि वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचायतही बोलवण्यात आली. पण झालं असं की, सर्वांनी सासरे आणि सुनेच्या बाजूनेच निर्णय दिला. महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. महिलेनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं.
मीडिया रिपोर्टनुसार, महिलेचं पहिलं लग्न २०१६ मध्ये झालं होतं. तेव्हा ती अल्पवयीन होती. तिचं घाईतच लग्न केलं कारण एका वर्षापूर्वीच मुलाच्या आईचं निधन होतं. यानंतर काही महिन्यातच सासरा सूनेच्या प्रेमात पडला. नंतर सूनही सासऱ्यावर प्रेम करू लागली. अशात महिलेनं पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने सासऱ्यासोबत लग्न केलं.
आपल्या सुनेसोबत लग्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव देवानंद आहे. त्यांचं वय सुमारे ४५ वर्ष आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच संबंधित महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला होता. यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्न केलं.