नकली 'सौदी प्रिन्स' जेरबंद, तब्बल २० वर्षं गुंतवणूकदारांना गंडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:38 PM2019-06-03T15:38:54+5:302019-06-03T15:47:15+5:30

अमेरिकेत जवळपास तीस वर्षांपासून स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचं सांगणाऱ्या व्यक्तीला फसवणुकीच्या गुन्ह्यात १८ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Fake Saudi Arab prince arrested in Florida | नकली 'सौदी प्रिन्स' जेरबंद, तब्बल २० वर्षं गुंतवणूकदारांना गंडवलं

नकली 'सौदी प्रिन्स' जेरबंद, तब्बल २० वर्षं गुंतवणूकदारांना गंडवलं

googlenewsNext

अमेरिकेत जवळपास तीस वर्षांपासून स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचं सांगणाऱ्या व्यक्तीला फसवणुकीच्या गुन्ह्यात १८ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यक्तीचं नाव एंथनी गिग्नॅक असं आहे. ही व्यक्ती वीस वर्षांपासून शाही लाइफस्टाइल जगत होता. त्याला शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, पकडण्यात आलेली व्यक्ती खाजगी विमान आणि महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करत होती. तसेच महागडे दागिणेही परिधान करत होता. त्याच्याकडे बिझनेस कार्डही होतं. 

(Image Credit : www.nytimes.com)

शुक्रवारी या स्वयंघोषित राजकुमाराच्या खोटेपणाचा भांडाफोड झाला आणि त्याला १८ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. फ्लोरिडातील न्यायाधीश म्हणाले की, गिग्नॅक एक ठग आहे. त्याने गुंतवणुकदारांकडून ८० लाख डॉलर लुटण्यासाठी स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचे सांगितले होते.

कोलंबियामध्ये जन्मलेल्या गिग्रॅकला मिशीगनमधील एका परिवाराने दत्तक घेतले होते. अमेरिकेतील अटॉर्नी ओर्शनने सांगितले की, एंथनी हा गुंतवणुकदारांना फसवण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून तो सौदीचा राजकुमार असल्याचं सांगत होता.

Web Title: Fake Saudi Arab prince arrested in Florida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.