गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:47 IST2021-07-05T12:14:32+5:302021-07-05T12:47:29+5:30

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, इजिप्तमधील एक तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. अशात तरूणीचे वडील तरूणाच्या मागे लागेल होते.

Egypt : Man jumps to death naked while being chased by lovers father | गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...

गर्लफ्रेन्डच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं, तरूणाने विना कपडे १३व्या मजल्यावरून मारली उडी आणि...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

इजिप्तमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूण तिला भेटायला गेला असतानाच अचानक तिचे वडील आले. यावेळी तरूणाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो प्रेयसीच्या वडिलांना बघून घाबरला. तरूणीचे वडील त्याला पकडण्यासाठी धावून गेले तर तरूणाने १३ व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. ज्यामुळे त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, इजिप्तमधील एक तरूण त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. अशात तरूणीचे वडील तरूणाच्या मागे लागेल होते, तेव्हा तरूणाने पकडलं जाऊ नये म्हणून इमारतीच्या १३व्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली उडी मारली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या रूममद्ये आक्षेपार्ह स्थितीत पकडला गेला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. अशात प्रेयसीच्या वडिलांपासून दूर पळण्याच्या प्रयत्नात तरूणाने बाल्कनीतून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला होता.

या प्रकरणी पोलीस म्हणाले की, शुक्रवारी सकाळी एक तरूण अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली पडल्याची सूचना मिळाली होती. सुरक्षाकर्मी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना समजलं की, मृत तरूणाचं तरूणीसोबत प्रेमप्रकरण होतं. ते शरीर संबंध ठेवत असताना पकडले गेले.

पोलिसांनुसार, रात्री तरूणी तरूणीच्या सहमतीने तिच्या रूममध्ये शिरला होता. तरूणीच्या वडिलांनी दोघांनाही रंगेहाथ पकडलं होतं. ज्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तरूणाच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत तरूणीला ताब्यात घेतलं गेलं आहे.
 

Web Title: Egypt : Man jumps to death naked while being chased by lovers father