पृथ्वीवर २४ नाही तर २५ तासांचा होईल एक दिवस, चंद्राचा 'खोडकरपणा' याला ठरेल कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:20 IST2026-02-25T15:19:24+5:302026-02-25T15:20:14+5:30
25 hour day on Earth : आपल्याला प्रश्न पडला असेल की, पृथ्वी स्वत:भोवती आरामात फिरत आहे, मग स्लो का होईल? तर यामागचं मुख्य कारण आहे आपला चांदो मामा म्हणजेच चंद्राचं गुरूत्वाकर्षण.

पृथ्वीवर २४ नाही तर २५ तासांचा होईल एक दिवस, चंद्राचा 'खोडकरपणा' याला ठरेल कारण
25 hour day on Earth : पृथ्वीवर येणाऱ्या काही वर्षांमध्ये काय काय बदल होतील याबाबतचे अनेक रिपोर्ट नेहमीच समोर येत असतात. कधी अनेक शहरं समुद्राखाली येणार असल्याची चर्चा होते, तर कधी महापूर येण्याची चर्चा तर कधी पृथ्वी नष्ट होण्याची चर्चा होते. आता सध्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये एक दिवस २४ तासांचा नाही तर २५ तासांचा असेल असं बोललं जात आहे. मुळात पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा स्पीड कमी होत आहे. सूर्याभोवती फिरतानाही हा स्पीड एकसारखा राहत नाही. वैज्ञानिकांच्या संशोधनातून समजतं की, कोट्यावधी वर्षांमध्ये हा बदल दिवसाच्या लांबीला प्रभावित करतो आणि भविष्यातही मोठा फरक दिसू शकतो. मुख्य म्हणजे ही प्रक्रिया पृथ्वीच्या जन्मापासून सुरू आहे. पण हे आपण नोटीस करू शकत नाही. कारण स्पीड फारच कमी आहे.
कधी होणार २५ तासांचा दिवस?
भलेही दिवस हा २५ तासांचा होणार असेल, पण घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण ही दिवस २४ ऐवजी २५ तासांचा होण्यासाठी अजून २० कोटी वर्ष बाकी आहेत. आपल्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना हा दिवस बघण्याचं नशीब मिळणार नाही. भलेही या गोष्टी खूप वेळ बाकी आहे. पण उत्सुकता आणि विज्ञान समजून घेण्यासाठी ही महत्वाची बाब आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल की, पृथ्वी स्वत:भोवती आरामात फिरत आहे, मग स्लो का होईल? तर यामागचं मुख्य कारण आहे आपला चांदो मामा म्हणजेच चंद्राचं गुरूत्वाकर्षण. चंद्र पृथ्वीवर ज्वार निर्माण करतो. हा ज्वार पाणी खेचतो, पण पृथ्वी फिरत असल्याने हा ज्वार जरा मागे पडतो. या तणावात एक घर्षण तयार होतं, ज्याने पृथ्वी स्लो होते. या बदल्यात चंद्राला थोडी ऊर्जा मिळते, त्यामुळे तो दरवर्षी पृथ्वीपासून ३.८ सेमी दूर जात आहे.
डायनासॉरच्या काळात २३ तासांचा दिवस
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, दर १०० वर्षात दिवसाच्या लांबीमध्ये जवळपास १.८ मिलीसेकंदाची वाढ होते. जर हाच दर कायम राहिला तर बरोबर २० कोटी वर्षानंतर दिवस २५ तासांचा होईल. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण डायनासॉरच्या काळात एक दिवस २३ तासांचा असायचा. त्याहूनही तर केवळ १९ तासांचा असायचा. ही प्रक्रिया पृथ्वीच्या विकासाचा भाग आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया होण्याची वेळ २० कोटी वर्ष दूर आहे. तेव्हा पृथ्वीवर एक दिवस २५ तासांचा असेल. त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना याची चिंता करण्याची गरज नाही. पण यातून आपल्याला हे कळून येतं की, आपल्या जीवनासोबतच आपलं ब्रम्हांड आणि ग्रहांची चालही सतत बदलत राहते.