मादक पदार्थ सापडल्याने जॅकी चॅनचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: August 18, 2014 19:21 IST2014-08-18T19:10:43+5:302014-08-18T19:21:29+5:30
कुंफुस्टार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅन याचा मुलगा जॅसी चॅनकडे मादक पदार्थ सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मादक पदार्थ सापडल्याने जॅकी चॅनचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
ऑनलाइन टीम
बिजिंग,दि. १८ - कुंफुस्टार म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅन याचा मुलगा जॅसी चॅनकडे मादक पदार्थ सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यासोबत तैवान येथील एका २३ वर्षिय अभीनेत्रीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जॅसी चॅन याने फँग झुमिंग या नावाने आपली ओळख चित्रपट व मालिकांमध्ये केली आहे. तसेच त्याच्यासोबत असलेली त्याची २३ वर्षिय मैत्रिण काय को चेंग तुंग ही तैवान येथील चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असून तिलाही मादक पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही बातमी बिजिंग टाइम्स व बिजिंग न्यूज या वृत्तपत्रांनी दिली आहे. तसेच याबाबत जॅसी व काय को यांनी 'विबो' या सोशल नेटवर्कींगसाइटवर अटकेबद्दल लिहले नसल्याने हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने या बातमी बद्दल शंकाव्यक्त केली आहे. आजपर्यंत तैवान व हाँगकाँग येथील अनेक सिनेकलाकारांना बिजिंग येथे मादकपदार्थ सापडल्याने अटक करण्यात आली आहे. त्यातच चॅन व काय को यांचीही भर पडली असल्याचे येथील स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे.