हेच होणार ना! आपल्याच लग्नात नवरदेवाने केलं असं काही, नवरीने थेट लग्न करण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:19 IST2021-06-26T15:13:00+5:302021-06-26T15:19:43+5:30
नवरी म्हणाली की, ज्या व्यक्तीने आपल्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायली की, नशेमुळे तो घोडीवरही बसू शकला नाही.

हेच होणार ना! आपल्याच लग्नात नवरदेवाने केलं असं काही, नवरीने थेट लग्न करण्यास दिला नकार
यूपीच्या शाहजहांपूरमध्ये नवरदेव आपल्याचा लग्नात घोडीवर बसू शकला नाही, ज्यामुळे नवरीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. गुरूवारी आपल्याच लग्नात नवरदेवाने इतकी दारू ढोसली होती की, तो घोडीवरही बसू शकत नव्हता. तो इतका टल्ली होता की, अनेकदा प्रयत्न करूनही त्याला घोडीवर चढता आलं नाही. अशात नवरीने लग्नास थेट नकार दिला.
नवरी म्हणाली की, ज्या व्यक्तीने आपल्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायली की, नशेमुळे तो घोडीवरही बसू शकला नाही. लग्नानंतर तो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. असं म्हणत नवरीने लग्नात नकार दिला. मात्र, नंतर बरंच समजावल्यावर नवरी लग्नासाठी तयार झाली आणि दोघांनी एकमेकांना हार घातला. पण नवरीच्या डोक्यातून नवरदेवाची ती गोष्ट जातच नव्हती. अखेर तिने सप्तपदी घेण्यास नकार दिला आणि तिच्या परिवाराने तिला पाठिंबा दिला. (हे पण वाचा : नवरी नटली, सुपारी फुटली; सहाव्या फेऱ्यानंतर 'ती' अचानक थांबली अन् म्हणाली... )
या घटनेवरून रात्रभर वाद सुरू होता. नंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांनी आपापला सामान परत केलं. ज्यानंतर नवरदेव नवरीला सोबत न नेताच परतला. दरम्यान खुटार येथे राहणाऱ्या नवरीचं लग्न सदर बाजारातील एका लॉनमध्ये होणार होतं.
लग्नाची सगळी तयारी झाली होती. वरातही हॉलपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी जेव्हा नवरदेव घोडी बसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो इतका नशेत होता की तो घोडीवर बसूही शकला नाही. हे सगळं बघून नवरीने लग्नास नकार दिला. नवरी म्हणाली की, जो मुलगा आपल्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू पिऊ शकतो की, घोडीवरही बसू शकत नाही. जर त्याच्यसोबत लग्न केलं तर आयुष्य खराब होईल. (हे पण वाचा : आईनं स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलाचं २३ वर्षीय तरुणीशी लावलं लग्न; पोलीस घरी पोहोचले तेव्हा...)
नशेत डोलत चालणाऱ्या नवरेदवाला पाहून नवरीने लग्नास नकार दिला. पोलीस अधिकारी अजय पाल म्हणाले की, नवरीकडच्या लोकांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. दोन्ही पक्षांमध्ये आपसात करार झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना वस्तू परत केल्या.