(Image Credit : boredpanda.com)

कित्येक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, बॉल फेकून तो आणायला कुत्र्यांना पाठवलं जातं. तुमच्याकडे किंवा तुमच्या जवळच्या कुणाकडे कुत्रा असेल तर तुम्हीही हे अनुभवलं असेल की, कुत्र्यांना बॉल खेळणं फारचं आवडतं. पण यातही एक कुत्र्याने फारच कमाल केली आहे. Finely नावाचा हा कुत्रा इतर कुत्र्यांपेक्षा फार वेगळा आहे. Finely हा एक गोल्डन रीट्रीवर प्रजातीचा कुत्रा आहे.

Finely ला टेनिस बॉलसोबत खेळणं फार आवडतं. पण त्याची खास बाब केवळ बॉलसोबत खेळणं ही नाही तर तो अर्धा डझन बॉल त्याच्या तोंडात एकाचवेळी पकडू शकतो. 

Finely केवळ सहा वर्षांचा आहे. त्याच्या खासियतच्या जोरावर त्याने तोंडात सर्वात जास्त बॉल पकडण्याचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. 

Finely हा छोटा होता तेव्हापासून त्याला टेनिस बॉलसोबत खेळायला फार आवडत होतं. हळूहळू त्याची ही आवड वाढत गेली आणि एकाचवेळी तोंडात जास्त बॉल पकडणंही तो शिकला.

आता Finely च्या मालकाला असं वाटतं की, त्याचं हे टॅलेन्ट सर्वाना बघायला मिळालं पाहिजे. आतापर्यंत हा रेकॉर्ड  Augie नावाच्या कुत्र्याच्या नावावर होता. २००३ मध्ये त्याने ५ बॉल एकत्र तोंडात पकडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. मात्र, Finely ने केलेल्या रेकॉर्डवर अजून अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.


Web Title: Dog obsessed with tennis balls breaks world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.