Do you know the worst sound in the world? Scientist found worst sound in the world | जगतील सगळ्यात खराब आवाज माहित्येय का? तज्ज्ञांनी दिलं उत्तर, मेंदूलाही होऊ शकतो त्रास

जगतील सगळ्यात खराब आवाज माहित्येय का? तज्ज्ञांनी दिलं उत्तर, मेंदूलाही होऊ शकतो त्रास

आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत अनेक प्रकारचे आवाज आपल्या कानी पडतात. काही आवाज हे शुभसंकेत देणारे असतात. तर काही आवाज काही पडल्यास वातावरणात शांतता पसरते. आवाजांबद्दल तुम्हाला माहीत नसेलली एक भन्नाट गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जगातील सर्वात खराब आवाजांची एक यादी शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. यातील आवाज ऐकल्यानंतर अनेकांची चिडचिड होते. कोणाला राग येतो तर कोणाला भीती वाटते. याशिवाय असे अनेक आवाज आहेत, ज्यातून जीवाला धोका असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण होते. 

ब्रिटनमधील विद्यापीठातील प्रोफेसर ट्रेवर कॉक्स यांच्या संशोधनात माणूस उलटी करताना जो आवाज काढतो तो सर्वात खराब आवाज असल्याचे समोर आले आहे. उलटीचा आवाज कानी पडल्यानंतर किळस वाटते. जास्तीत जास्त लोकांना हा आवाज आवडत नसल्याचे समोर आलं आहे. , लहान मुलांचा रडण्याचा आवाज, लोखंडाचं टेबल फरशीवरून ओढताना होणारा आवाज,  मशीनचा आवाज, जेवताना होणारा तोंडातील आवाजांचा या यादीत समावेश आहे. तुम्हालाही जाणवले असेल की, दैनंदिन जीवन जगत असताना असे आवाज कानी पडल्यास खूप त्रास होतो.  काही सेंकंदांसाठी खूप किसळवाणेही वाटते.  

विशेष म्हणजे अशा प्रकारचे जास्तीत जास्त आवाज हे घर्षण केल्यामुळे निर्माण होतात. या आवाजांचा  मेंदूवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आलं होतं. यात असं दिसून आलं की, या आवाजांमुळे निर्माण होत असलेल्या भीतीमुळे मेंदूत तयार होणाऱ्या न्यूरॉन्समुळे आवाज खराब वाटतात. काय सांगता?... 'या' गावात फक्त दोघचं राहतात, तरीही घेतलीय कोरोनाची धास्ती!

या आवाजामुळे चिडचिड होते तर अनेकांना राग येतो. दोन आवाज असे असतात ज्यामुळे कांनांना आणि मेंदूला त्रास होतो. अलार्म किंवा घोरण्याच्या आवाजाचा यात समावेश होतो. आवाजासबंधी समस्या उद्भवल्यास सिलेक्टिव साउंड सेंसिटिविटी सिंड्रोमचा धोका असू शकतो. या आजारात विशिष्ट आवाजांमुळे ताण तणाव, भीती जाणवते.  जबरदस्त! ९ महिन्यांच्या गर्भवतीने ५ मिनिटांत पार केलं 'इतकं' अंतर, पाहा व्हिडीओ

Web Title: Do you know the worst sound in the world? Scientist found worst sound in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.