शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

रंगा आणि बिल्लाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच, पण हे दोघे इतके कुख्यात का होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 2:18 PM

रंगा आणि बिल्ला ही नावं कितीतरी सिनेमांमध्ये तुम्ही ऐकली असतील. साधारण ७०-८० च्या दशकातील बहुतेक व्हिलन किंवा साइड व्हिलनची नावं हीच राहत होती.

रंगा आणि बिल्ला ही नावं कितीतरी सिनेमांमध्ये तुम्ही ऐकली असतील. साधारण ७०-८० च्या दशकातील बहुतेक व्हिलन किंवा साइड व्हिलनची नावं हीच राहत होती. पण ही नावं इतकी का वापरली जायची? तुम्हीही अनेकदा ही नावं ऐकली असतील. मुळात ही काही काल्पनिक नावं नाहीत. तर ७० च्या दशकातील हे दोघे भारतातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक होते. अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण...

(Image Credit : aajtak.intoday.in)

६० च्या दशकात छोट्या-मोठ्या चोरी करून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारे रंगा(कुलजीत सिंह आणि बिल्ला(जसबीर सिंह) ७० च्या काळापर्यंत कुख्यात गुन्हेगार झाले होते. १९७८ मध्ये या दोघांनी अपहरण आणि हत्येचा एक असा गुन्हा केला होता की, त्यावेळी देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई सुद्धा टेंशनमध्ये आले होते. हा गुन्हा इतका मोठा होता की, देशभरात एकच चर्चा रंगली होती. देशच नाही तर परदेशातही यांची चर्चा होत होती.

२६ ऑगस्ट १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाने भारतीय नौसेनेचे अधिकारी मदन मोहन चोपडा यांची मुले गीता(१६) आणि संजय(१४) यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. अपहरणाच्या २ दिवसांनंतर २८ ऑगस्टला दोन्ही मुलांचे मृतहेद आढळून आले होते.

पैशांसाठी केलं होतं अपहरण

रंगा आणि बिल्लाने नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या एका मुलीचं आणि एका मुलीचं अपहरण खंडणीसाठी केलं होतं. पण जेव्हा रंगा आणि बिल्ला यांना कळाले की, या मुलांचे वडील नेव्हीमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी दोघांची हत्या केली.

दिल्लीसहीत देश हादरला होता

(Image Credit : aajtak.intoday.in)

नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या मुलांच्या हत्याकांडामुळे दिल्लीसहीत देशाला धक्का बसला होता. त्यावेळी या घटनेची चर्चा परदेशातही पोहोचली होती. त्यानंतर लोकांमध्ये रंगा आणि बिल्लाची दहशत निर्माण झाली होती.

पंतप्रधानांनी दिले होते चौकशीचे आदेश

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना जेव्हा या घटनेबाबत माहीत मिळाली तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता. कारण देशातील एका मोठ्या सैन्य अधिकाऱ्याही ती मुलं होती. त्यावेळी देशात लोकांमध्ये संताप बघायला मिळाला होता. रस्त्यांवर आणि संसदेत मोरारजी देसाई सरकारवर टिका झाली होती. तेव्हा मोरारजी देसाई यांनीच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.

(Image Credit : aajtak.intoday.in)

नंतर पोलिसांनी मोठ्या मेहनतीनंतर ८ सप्टेंबर १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाला आग्र्याहून अटक केली. दोघेही आग्र्यात कालका मेलच्या त्या डब्यात चढले होते. हा डबा सैनिकांसाठी आरक्षित होता. यातीलच एका सैनिकाने पेपरमधील फोटोवरून दोघांना ओळखलं होतं. नंतर चार वर्ष दोघांची कोर्टात सुनावणी सुरू होती. अखेर १९८२ मध्ये रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीMurderखून