पैज जिंकण्यासाठी त्याने असं काही केलं की गमावला जीव, वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:18 IST2019-07-09T12:13:10+5:302019-07-09T12:18:39+5:30

मित्रांसोबत मस्ती करत असताना एखाद्या गोष्टीवरून पैज लावणे ही फारच सामान्य बाब आहे. कधी कधी तर पैज जिंकण्यासाठी काही लोक असं काही करतात, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल.

Death of Australian man who ate lizard as challenge | पैज जिंकण्यासाठी त्याने असं काही केलं की गमावला जीव, वाचून बसेल धक्का!

पैज जिंकण्यासाठी त्याने असं काही केलं की गमावला जीव, वाचून बसेल धक्का!

मित्रांसोबत मस्ती करत असताना एखाद्या गोष्टीवरून पैज लावणे ही फारच सामान्य बाब आहे. कधी कधी तर पैज जिंकण्यासाठी काही लोक असं काही करतात, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. असंच काहीसं ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीसोबत झालं. पण त्याला ही पैज इतकी महागात पडली की, यात त्याला जीव गमवावा लागला. 

ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनमध्ये एका पार्टीदरम्यान डेव्हिड डूवेल नावाच्या एका व्यक्तीने पैज जिंकण्याच्या नादात पाल खाल्ली. ज्यामुळे त्याच्या पोटात इन्फेक्शन झालं आणि दहा दिवसात त्याचा मृत्यू झाला.

डेव्हिडची पार्टनर एलिका ब्रिकनेलने सांगितले की, तो एक फार चांगला वडील होता. प्रत्येक व्यक्ती त्याला पसंत करत होती. त्याला त्याच्या तिन्ही मुलांची फार चिंता होती. पण डेव्हिड असा अचानक गेल्याने आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे.

एलिराने सांगितले की, मला नाही माहीत त्याच्या मृत्यू कसा झाला. पण त्याच्या डेथ सर्टिफिकेटवर लिहिले आहे की, त्याने एक पाल गिळंकृत केली होती. याच गोष्टीवरून अंदाज लावला जात आहे की, पार्टीमध्ये काय झालं असावं.

या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सोबतच यावरून अनेकांनी हे शिकायला हवे की, कोणताही विचार न करता पैज लावू नये. कारण असं करणं तुमच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं.

Web Title: Death of Australian man who ate lizard as challenge