Deaf man in New York sues porn sites for lack of closed captions | व्हिडीओला सबटायटल्स नाहीत म्हणून कर्णबधीर व्यक्तीने पॉर्न वेबसाइट्सना खेचले कोर्टात!

व्हिडीओला सबटायटल्स नाहीत म्हणून कर्णबधीर व्यक्तीने पॉर्न वेबसाइट्सना खेचले कोर्टात!

न्यूयॉर्कमधील एका कर्णबधीर व्यक्तीने जगभरात लोकप्रिय असलेल्या तीन वेबसाइटवर भेदभाव करण्याचा आरोप करत केस ठोकली आहे. या व्यक्तीने त्याच्या अर्जात म्हटले आहे की, सबटायटल्सशिवाय तो या वेबसाइट्सवर उपलब्ध व्हिडीओंचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही.

ब्रुकलीन फेडरल कोर्टात गुरूवारी देण्यात आलेल्या अर्जात यारोस्लाव सुरिज नावाच्या व्यक्तीने पॉर्नहब, रेडट्यूब आणि यूपॉर्न आणि त्यांची कॅनेडियन मुख्य कंपनी माइंडगीक विरोधात कोर्टात केस करून म्हटले आहे की, ते अमेरिकन्स विथ डिसअ‍ॅबिलिटी अ‍ॅक्टचं उल्लंघन करत आहेत. याआधीही सुरिजने फॉक्स न्यूज विरोधात केस केली होती.

त्याने सांगितले की, त्याने ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात काही व्हिडीओ बघण्याचा प्रयत्न केला होतो, पण बघू शकला नाही. सुरिजने २३ पानांच्या आपल्या अर्जात म्हटले आहे की, 'सबटायटल्सशिवाय कर्णबधिर आणि कमी ऐकायला येणारे लोक या व्हिडीओंचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही. सर्वसामान्यांना पूर्ण आनंद मिळतो'. 

त्याने मागणी केली आहे की, पॉर्न वेबसाइट्सनी सबटायटल्स द्यावेत. तसेच त्याने कंपन्यांकडे नुकसान भरपाई सुद्धा मागितली आहे. तर दुसरीकडे पॉर्न हबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेबासाइटवर सबटायटल असलेल्या व्हिडीओंचं सुद्धा एक सेक्शन आहे आणि त्यांनी त्याची लिंकही शेअर केली आहे.


Web Title: Deaf man in New York sues porn sites for lack of closed captions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.