गवत चरण्यासाठी बकऱ्या भाड्याने देणे आहे! जोडप्याचा भन्नाट व्यवसाय, करतात लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:12 AM2022-05-17T11:12:25+5:302022-05-17T11:12:39+5:30

बकरी शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. ती गवत चरते. तिचे दुध विकण्याचा व्यवसाय करता येतो. पण गवत चरण्यासाठी बकरीला कुणी भाड्याने देईल का?

couple gives goat for cutting grass | गवत चरण्यासाठी बकऱ्या भाड्याने देणे आहे! जोडप्याचा भन्नाट व्यवसाय, करतात लाखोंची कमाई

गवत चरण्यासाठी बकऱ्या भाड्याने देणे आहे! जोडप्याचा भन्नाट व्यवसाय, करतात लाखोंची कमाई

Next

ग्रामीण भागात लोक गायी, म्हशी इत्यादी प्राणी पाळतात. यात प्रामुख्याने बकरी पाळली जाते. बकरी शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. ती गवत चरते. तिचे दुध विकण्याचा व्यवसाय करता येतो. पण गवत चरण्यासाठी बकरीला कुणी भाड्याने देईल का? 

असं म्हणतात तुमच्या जीभेवर साखर असेल तर तुम्ही दगडही विकू शकता. याचा अर्थ तुमची वाणी जर गोड असेल तर तुम्ही कोणतीही वस्तू सहज विकू शकता. फक्त तुम्हाला बिझनेसची चांगली आयडिया सुचली पाहिजे. ब्रिटनच्या साऊथ वेल्स येथील जोडप्याला अशी युक्ती सुचली आणि त्यांचं नशीबच पालटलं. त्यांनी चक्क बकऱ्याच भाड्याने द्यायला सुरुवात केली. या बकऱ्या गवत कापण्याच्या मशिन एवजी गवत कापण्यासाठी वापरल्या जातात.

ज्या लोकांना त्यांच्या लॉनमधील गवत कापुन हवे असते ते डॉन हार्ट व रिचर्ड व्हाईट यांना संपर्क साधतात. या कपलकडे २०० पेक्षा अधिक बकऱ्या आहेत व त्या भाड्याने गवत चरण्यासाठी म्हणजेच कापण्यासाठी मिळतात. लॉनवरच गवत कापण्यासाठी या बकऱ्यांचा उपयोग करण्याची ही भन्नाट आयडिया या कपलला ३ वर्षांपुर्वी सुचली.

ते म्हणतात, या बकऱ्या गवत चरण्यासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याचेही काम करतात. लॉनमधील गवत कापण्यासाठी तीन बकऱ्या पुरेश्या आहेत. पण लॉन मोठा असेल तर ३० बकऱ्या लागतात. प्रत्येक बकरीसाठी १० पाऊंड्स द्यावे लागतात. या बकऱ्यांना जीपीएसपण लावले जातात त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोपे जाते.

Web Title: couple gives goat for cutting grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.