बाबो! गर्लफ्रेन्डच्या दोन बहिणी म्हणाल्या आमच्यासोबतही लग्न कर, तरूणाने तिघींनाही बनवलं पत्नी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 19:06 IST2022-03-03T18:55:36+5:302022-03-03T19:06:20+5:30
हा तरूण आफ्रिकन देश कांगोचा राहणारा असून त्याचं नाव Luwizo आहे. कथितपणे Luwizo ला तिन्ही बहिणीने लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

बाबो! गर्लफ्रेन्डच्या दोन बहिणी म्हणाल्या आमच्यासोबतही लग्न कर, तरूणाने तिघींनाही बनवलं पत्नी!
(Image Credit : nypost.com)
एका व्यक्तीने एकाच वेळी तीन महिलांसोबत लग्न केल्याने तो सध्या चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला ट्रिपलेट्स आहेत. हा तरूण आफ्रिकन देश कांगोचा राहणारा असून त्याचं नाव Luwizo आहे. कथितपणे Luwizo ला तिन्ही बहिणीने लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
एकत्र तीन महिलांसोबत लग्न करणाऱ्या Luwizo चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या तीन लग्नाबाबत Luwizo ने एका यूट्यूब चॅनलला सांगितलं की, 'असं वाटत आहे की मी एखादं स्वप्न बघत आहे'. या लग्नामुळे त्याच्या तिन्ही पत्नी आनंदी आहेत.
nypost.com च्या रिपोर्टनुसार, सर्वातआधी Luwizo ची भेट नतालीसोबत झाली होती. नतालीने नंतर त्याची भेट तिच्या बहिणी Nadege आणि Natasha सोबत करून दिली. या भेटीनंतर नतालीच्या बहिणीही Luwizo च्या प्रेमात पडल्या. कथितपणे नंतर ट्रिपलेट्स असलेल्या बहिणींनी Luwizo ला लग्नासाठी प्रपोज केलं.
Afrimax English सोबत बोलताना ट्रिपलेट्स म्हणाल्या की, 'जेव्हा आम्ही Luwizo ला सांगितलं की, त्याला आम्हा तिघींसोबतही लग्न करायचं आहे. तर तो शॉक्ड झाला. कारण तो आधीच आमच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे तो लग्नाला नकार देऊ शकला नाही. आमचंही त्याच्यावर सारखं प्रेम आहे'.
Luwizo म्हणाला की, आमच्या या लग्नाने घरातील लोक खूश नव्हते. माझ्या आई-वडिलांना समजत नव्हतं की, मी काय करतोय. त्यांनी या लग्नाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण नंतर ते लग्नात सहभागी झाले'.
तो म्हणाला की, मी तिघींसोबतही लग्न करून आनंदी आहे. याने काही फरक पडत नाही की, दुसरे काय विचार करतात. मी फक्त हेच सांगू शकतो की, प्रेमाला काही सीमा नसते. सोशल मीडियावर लोक या लग्नाबाबत भरभरून कमेंट्स करत आहेत.