शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नासलेल्या दुधापासून पनीर नाही तर बनवले जात आहेत कपडे, पाहा किती असते किंमत आणि कसे बनवतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:15 IST

Milk Fabric : जे दूध फाटल्यावर म्हणजेच नासल्यावर आपण फेकून देतो किंवा ज्यापासून पनीर बनवतो, त्याच दुधापासून आज डिझायनर सूट आणि साड्या तयार केल्या जात आहेत.

Milk Fabric : उलन आणि सूती कापड विसरा… आता दुधापासूनही कपडे तयार होत आहेत! होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण कधी विचारही केला नसेल की, जे दूध फाटल्यावर म्हणजेच नासल्यावर आपण फेकून देतो किंवा ज्यापासून पनीर बनवतो, त्याच दुधापासून आज डिझायनर सूट आणि साड्या तयार केल्या जात आहेत. या कापडाला मिल्क फॅब्रिक असं म्हणतात. आता हे कसं तयार होतं, कितीला मिळतं हेच आज आपण पाहणार आहोत.

एक लिटर दूध = फक्त 10 ग्रॅम फॅब्रिक!

मिल्क फॅब्रिक तयार करणं खूपच मेहनतीचं काम आहे. कारण 1 लिटर दुधापासून फक्त 10 ग्रॅम कापड तयार होतं.  एक टी-शर्ट तयार करण्यासाठी 60–70 लिटर दूध लागतं. म्हणूनच याची किंमतही खूप जास्त असते. 1 मीटर मिल्क फॅब्रिक हे ₹15,000 ते ₹45,000 रूपये किंमतीचं असतं. तर एक साडी ₹3 ते ₹5 लाख किंमतीची असते.

हा कापड तयार कसा करतात?

याची प्रक्रिया ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आधी दुधाला आधी फाडलं म्हणजेच नासवलं जातं. त्यातून केसीन प्रोटीन वेगळं केलं जातं. हे प्रोटीन पाण्यात मिसळून लिक्विड बनवलं जातं. स्पिनिंग मशीनमध्ये टाकून ते रेशांमध्ये बदलतात. हे रेशे रेशमासारखे मुलायम आणि चमकदार असतात. त्यापासून मग कापड विणलं जातं. यात कोणतेही केमिकल वापरले जात नाहीत, म्हणूनच हे कापड 100% नैसर्गिक, बायोडिग्रेडेबल आणि स्किन-फ्रेंडली आहे.

इतिहास जुना आहे…

दूधापासून कापड बनवण्याची कल्पना नवी नाही. 1930 च्या दशकात इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धात उलन कमी पडल्यावर तिथे दूधातून कापड तयार करण्यात आलं. त्याला Lanital असं नाव होतं. युद्ध संपल्यानंतर उलन आणि सिंथेटिक कापड स्वस्त झाले आणि ही टेक्नोलॉजी गायब झाली. पण आता पुन्हा 2025 मध्ये मिल्क फॅब्रिकचं धमाकेदार पुनरागमन झालं आहे.

आज लोकांना हे कापड का आवडतंय?

आज सस्टेनेबल फॅशनचा जमाना आहे. प्लास्टिकपासून बनणारा पॉलिएस्टर लोक टाळू लागले आहेत. जर्मनीतील QMilk कंपनी  फक्त वाया जाणारं किंवा खराब झालेलं दूध वापरते. युरोपमध्ये दरवर्षी 20 लाख टन दूध फेकलं जातं, तेच कपड्यात बदललं जातं.

मिल्क फॅब्रिकचे फायदे

रेशमापेक्षा 3 पट जास्त मऊ

अँटी-बॅक्टेरियल – घाम आला तरी दुर्गंध येत नाही

थर्मो-रेग्युलेटिंग – हिवाळ्यात उबदार, उन्हाळ्यात थंड

अॅलर्जी नसलेल्यांसाठी योग्य

100% नैसर्गिक आणि 2 वर्षात पूर्णपणे जमिनीत मिसळतं

English
हिंदी सारांश
Web Title : Milk to fabric: Clothes made from spoiled milk; Know the price!

Web Summary : Spoiled milk transforms into luxurious 'milk fabric,' used for designer clothing. One liter yields only 10 grams, making it expensive. It's eco-friendly, antibacterial, and soft. This sustainable fashion revival utilizes wasted milk.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स