विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 01:20 PM2020-06-10T13:20:57+5:302020-06-10T13:34:55+5:30

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

chemistry teacher desi jugaad to teach online classes video goes viral | विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!

Next
ठळक मुद्देकेमिस्ट्रीच्या शिक्षिका मोमिता बी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिवकविण्यासाठी हँगरला मोबाईल बांधला आहे आणि हा हँगर कपड्याने लटकविला आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय सरकारकडून करण्यात येत आहेत. तसेच, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास शिक्षकांकडून घेण्यात येत आहे. 

यातच काही शिक्षक लाईव्ह तर काही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. मात्र, असे करत असताना अनेक शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र, एका शिक्षिकेने असा जुगाड तयार केला आहे. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिकवताना  कोणतीच अडचण येत नाही. उलट त्यांनी केलेल्या या जुगाडामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

केमिस्ट्रीच्या शिक्षिका मोमिता बी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिवकविण्यासाठी हँगरला मोबाईल बांधला आहे आणि हा हँगर कपड्याने लटकविला आहे. यासमोर भिंतीला चॉकबोर्ड लटकविला असून त्या येथून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हा व्हिडिओ त्यांनी गेल्या आठवड्यापूर्वी लिंक्डइनवर शेअर केला आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे.

गेल्या आठवड्यात मोमिता बी यांनी आपल्या लिंक्डइन पेजवर हा व्हिडिओ शेअर केला. तसेच लिहिले की, 'माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे, मी मुलांना शिकवण्यासाठी हा देसी जुगाड लावला आहे.' या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. 600 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

याचबरोबर, या व्हिडिओचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करण्यात येत आहेत. तसेच, या शिक्षिकेचे कौतुकही करण्यात येत आहे. एका ट्विटर युजरने स्क्रीनशॉट शेअर करुन लिहिले की, 'या फोटोने माझा दिवस तयार आहे. तर एका व्यक्तीने 'सॅल्यूट टू डेडिकेशन' असे लिहिले.

दरम्यान, कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल अडीच लाखांवर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. 

आणखी बातम्या...

मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Web Title: chemistry teacher desi jugaad to teach online classes video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.