VIDEO : स्टेजवर नवरीने नवरदेवाला दिल्या तीन-चार कानशिलात, बघा पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 14:11 IST2022-04-18T14:08:26+5:302022-04-18T14:11:05+5:30
Social Viral : स्वासा बुजुर्ग गावतील ही घटना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, १७ एप्रिलला नवरदेव रविकांत अहिरवार वरात घेऊ नवरीच्या घरी आला होता.

VIDEO : स्टेजवर नवरीने नवरदेवाला दिल्या तीन-चार कानशिलात, बघा पुढे काय झालं...
Social Viral : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात रविवारी रात्री उशीरा झालेल्या एका लग्नातून आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. स्वासा बुजुर्ग गावात राहणारा मनोहर अहिरवारची मुलगी रीनाचं लग्न जालोन जिल्ह्यातील चमारी गावातील रविकांत अहिरवारसोबत ठरलं होतं. या लग्नात हार घालताना नवरी अचानक भकली आणि तिने नवरदेवाच्या कानशिलात लगावल्या. यानंतर दोन्ही पक्षात हाणामारी सुरू झाली.
स्वासा बुजुर्ग गावतील ही घटना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, १७ एप्रिलला नवरदेव रविकांत अहिरवार वरात घेऊ नवरीच्या घरी आला होता. लग्नाचे सगळे रितीरिवाज सुरू होते. यादरम्यान जेव्हा हार घालण्याची वेळ आली तेव्हा नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हात टाकला. पण त्यानंतर नवरी अचानक संतापली आणि तिने नवरदेवाच्या चार-पाच कानशिलात लगावल्या. त्यानंतर ती स्टेजवरून निघून गेली. यानंतर दोन्हीकडील पाहुण्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कसंतरी वाद थांबवला. त्यानंतर पुन्हा लग्न झालं.
दरम्यान नवरीने असं का केलं याचं उत्तर कुटुंबिय आणि पोलिसांकडे नाहीये. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओवर एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच लोक ही घटना पाहून हैराणही झाले आहेत.