लग्न लागणार इतक्यात नवरी प्रियकरासोबत फरार, नवरदेवाने जे केलं त्यावर बसणार नाही विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 12:38 IST2023-06-30T12:35:19+5:302023-06-30T12:38:05+5:30

Marriage News : नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 

Bride run away with lover on marriage day groom consumes glass powder in UP | लग्न लागणार इतक्यात नवरी प्रियकरासोबत फरार, नवरदेवाने जे केलं त्यावर बसणार नाही विश्वास!

लग्न लागणार इतक्यात नवरी प्रियकरासोबत फरार, नवरदेवाने जे केलं त्यावर बसणार नाही विश्वास!

Marriage News : यूपीमधून सतत लग्नासंबंधी अजब घटना समोर येत असतात. पुन्हा एकदा  उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून लग्नासंबंधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरी लग्नाच्या मंडपातून प्रियकरासोबत पळून गेली. नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 

नवरदेव वरात घेऊन आला. लग्नाचे रितीरिवाज सुरू झाले. हार घालण्याची वेळ आली तेव्हा नवरी पळून गेली. दुसरीकडे नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने काचेचे तुकडे बारीक करून खाल्ले. ज्यामुळे त्याची स्थिती गंभीर झाली. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला लखनौ ट्रामा सेंटरला रेफेर करण्यात आलंय.

सेमौरी गावातील ही घटना आहे. इथे राहणारा अजय कुमार याचं लग्न आशा नंदपूर येथील शिवानीसोबत ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी 28 जूनला नवरदेव अजय वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. नवरीकडील लोकांनी त्यांचं स्वागत केलं. नवरदेव घोडीवर बसून वरात काढण्यासाठी तयार झाला होता. पण हार घालण्याचा रिवाज होण्याआधीच नवरदेवाकडील लोकांना सूचना मिळाली की, नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. 

मुलीकडील लोकांना याची सूचना पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना शांत केलं आणि वरात घरी परत पाठवली. पण नवरीशिवाय वरात परत न्यावी लागल्याने नवरदेवाला धक्का बसला होता. कशीतरी रात्र गेली आणि सकाळी नवरदेवाने काचेचे तुकडे बारीक करून गिळले. ज्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याच्यावर आता लखनौच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती गंभीर आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Bride run away with lover on marriage day groom consumes glass powder in UP