नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 16:21 IST2022-05-21T16:21:21+5:302022-05-21T16:21:59+5:30
UP : नवरदेवाची पोलखोल होताच उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं.

नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर भागातील परियर गावातील राहणारा लखन कश्यपच्या मुलीचं लग्न कल्याणपूर कानपूर नगरमधील एका तरूणासोबत ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे नवरदेवाची वरात आली होती. रितीरिवाज झाल्यावर सप्तपदीवेळी नवरदेवाला चक्कर येऊन तो पडला. नवरीच्या भावाने नवरदेवाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पाणी शिंपडलं. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर त्याच्या हातात नवरदेवाचा विग आला. हे बघता उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं. त्यानंतर नवरीने लग्न करण्यास नकार दिला. यादरम्यान दोन्हीकडील लोकांमध्ये मारहाण होण्याची वेळ आली होती.
झालं असं की, निशाचं लग्न विकास कॉलनी कानपूरच्या पंकज कश्यपसोबत ठरलं होतं. २० मे च्या सायंकाळी नाचत-वाजत नवरदेवाची वरात नवरीच्या दारात पोहोचली. नवरीकडील लोकांनी वरातीचं जोरदार स्वागत केलं. पाहुण्यांनी डीजेवर डान्स भरपूर आनंद घेतला. जेवण झाल्यावर हार घालण्याचा रिवाज पार पडला. त्यानंतर सप्तपदीसाठी नवरदेव मंडपात पोहोचला. तयारी पूर्ण झाली होती.
यादरम्यान नवरदेवाला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये गोंधळ उडाला. नवरीच्या भावाने नवरदेवाच्या डोक्यावर हात फिरवायला सुरूवात केली. तेव्हा अचानक नवरदेवाचा विग त्याच्या हातात आला. टकला नवरदेवाची पोलखोल झाल्यावर नवरीकडील लोक हैराण झाले.
तरी सुद्धा घरातील वयोवृद्ध मंडळींनी वाद शांत केला. मग नवरीकडील लोकांनी नवरदेवावर फसवणुकीचा आरोप लावला. या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, नवरदेवाचा विग हाती आल्याने नवरीकडील लोक लग्नासाठी तयार नव्हते. पोलिसांसमोरच दोन्हीकडील लोक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.